गौतमपुढे ‘गंभीर’ समस्या, एका ट्विटमुळे दिल्ली पोलिसांच्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?
गौतम गंभीरने एक ट्विट करुन दिल्लीतील सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या त्याच एका ट्विटने तो दिल्ली पोलिसांच्या रडारवर आलाय. (Delhi Police inquiry Gautam Gambhir Over Fabiflue medicine Tweet)

नवी दिल्ली : कोरोनाच्या कठीण काळात दातृत्वाचे अनेक हात मदतीसाठी पुढे येतायत. मग माणसातलेच देवदूत असोत, सामाजिक संघटना असोत काही मोजके राजकारणी असोत. खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) एक ट्विट करुन दिल्लीतील सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या त्याच एका ट्विटने तो दिल्ली पोलिसांच्या रडारवर आलाय. त्याने केलेल्या ट्विटमुळे दिल्ली पोलिसांच्या सवाल-जवाबाला आता गौतम गंभीरला सामोरं जावं लागणार आहे. (Delhi Police inquiry Gautam Gambhir Over Fabiflue medicine Tweet)
एका ट्विटमुळे गौतमपुढे ‘गंभीर’ समस्या
25 एप्रिल रोजी, गंभीरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने आपल्या फाउंडेशनच्या वतीने फॅबीफ्लूच्या औषधांचे विनामूल्य वितरण करण्याची घोषणा केली. गंभीरने म्हटलं होतं की, “आपण सध्या सगळे जण एकमेकांच्या पाठीशी उभे आहोत. मी दिल्लीच्या लोकांना फॅबीफ्लू औषध देत आहे, जे तुम्ही जीजीएफच्या कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान जाऊ शकता. यासाठी आपल्याला आपलं आधार आणि डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन दाखवावी लागेल. याशिवाय आम्ही ऑक्सिजन सिलिंडरही देत आहोत.”
दिल्ली पोलिसांच्या रडारवर गौतम गंभीर का?
गंभीरने रुग्णांसाठी औषध मोफत देऊन चांगलं काम करण्याचा इरादा केला खरा पण त्याच्यासमोर अडचणी आता वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांना आता हे जाणून घ्यायचंय की फॅबीफ्ल्यू औषधं गंभीरकडे नेमकी आली कुठून?
गंभीरच्या मोफत औषध वाटपावरुन काही राजकीय नेत्यांनी त्याच्यावर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या पवन खेरा आणि आपच्या दुर्गेश पाठक यांनी गंभीरवर आरोप करताना ही औषधं गौतमकडे कुठून आली, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. ज्यानंतर आता दिल्ली पोलीस गंभीरची चौकशी करणार आहे.
गौतम गंभीर फाऊंडेशन दिल्लीतील लोकांसाठी मैदानात
कोरोनाकाळात गौतम गंभीर आणि त्याचं फाऊंडेशन दिल्लीतील लोकांसाठी मैदानात आहे. सर्वसामान्यांना विविध प्रकारे गौतम गंभीर फाऊंडेशन मदत करत आहे. पण आता स्वत: गौतमच गंभीर समस्येत आहे. येत्या काही दिवसांत त्याला दिल्ली पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील.
(Delhi Police inquiry Gautam Gambhir Over Fabiflue medicine Tweet)
हे ही वाचा :
कोहली बाबर आझमच्या ‘एक पाऊल पुढे’, पाकिस्तानच्या दिग्गजाची विराटवर स्तुतीसुमने
Video : दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन, जोफ्रा आर्चरचा डोकं फोडणारा बाऊन्सर, बॅट्समन थोडक्यात वाचला!