मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) 17 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात (Mumbai Indians vs Punjab Kings) पार पडला. या सामन्यात मुंबईच्या इशान किशनचा (Ishan Kishan) पुन्हा एकदा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्याने पंजाबविरुद्ध 17 चेंडूत 6 धावा केल्या. मुंबईला जेव्हा रन्सची गरज होती तेव्हा त्याने बरोबर विकेट्स टाकली. त्याच्या फ्लॉप शो ने संघाची डोकेदुखी वाढली आहे. इकडे सोशल मीडियावर इशानला झालंय तरी काय? असा सवाल आता क्रिकेटप्रेमी विचारु लागले आहेत. (IPL 2021 Mumbai Indians vs Punjab kings Ishan Kishan Flop Show 17 ball 6 runs)
इशान किशनच्या बॅटमधून आयपीएलच्या 14 व्या पर्वात रन्स निघालेल्या नाहीयत. इशानने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांत त्याची निराशाजनक कामगिरी राहिलेली आहे. एकाही मॅचमध्ये त्याची बॅट बोललेली नाहीय किंबहुना त्याचा स्ट्राईक रेटही चांगला नाहीय.
पंजाबविरुद्ध त्याने 17 चेंडूत 6 धावा केल्या. फिरकीपटू रवी बिश्नोईने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढलं. पहिल्यांदा अतिशय संथ खेळणारा किशन सेट झाल्यानंतर फटकेबाजी करेल, असं वाटत असताना त्याने बिश्नोईला आपली विकेट दिली. यानंतर मात्र लोकांनी सोशल मीडियावर इशानला भरपूर ट्रोल केलंय.
पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान पंजाबने 1 विकेट गमावून 17.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक नाबाद 60 धावा केल्या. तर ख्रिस गेलने नाबाद 43 धावांची खेळी केली. मुंबईकडून राहुल चहरने एकमेव विकेट घेतली.
आयपीएलचं 14 वं पर्व मुंबई इंडियन्ससाठी खूपच निराशाजनक राहिलं आहे. मुंबईने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 सामने मुंबईने गमावले आहेत. 2 सामने मुंबईने लागोपाठ गमावले आहेत.
(IPL 2021 Mumbai Indians vs Punjab kings Ishan Kishan Flop Show 17 ball 6 runs)
हे ही वाचा :
VIDEO | ख्रिस गेलचे गगनचुंबी षटकार पाहून कोच जॉन्टी ऱ्होड्सची जबरदस्त रिअॅक्शन
IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.