Dutee Chand: धावपटू दुती चंदचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल काही खास गोष्टी

| Updated on: Feb 03, 2022 | 7:00 AM

जाजपूर जिल्ह्यात एका गरीब कुटुंबात दुती चंदचा जन्म झाला. दुतीने अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करुन, आंतरराष्ट्रीय धावपटू होण्यापर्यंत टप्पा गाठला आहे.

Dutee Chand: धावपटू दुती चंदचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल काही खास गोष्टी
runner dutee chand
Follow us on

भारताची स्टार धावपटु दुती चंदचा (Dutee Chand) आज 26 वा वाढदिवस आहे. तीन फेब्रुवारी 1996 रोजी ओदिशाच्या (Odisha) जाजपूर जिल्ह्यात एका गरीब कुटुंबात दुती चंदचा जन्म झाला. दुतीने अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करुन, आंतरराष्ट्रीय धावपटू (Sprinter) होण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे. धावण्याच्या शर्यतीत 100 मीटर गटामध्ये ती भारताचे प्रतिनीधीत्व करते. इटलीत जुलै 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड यूनिवर्सिटी गेम्समध्ये तिने इतिहास रचला होता. दुती महिलांच्या ट्रॅक अँड फिल्ड इवेंट्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू बनली होती. दुतीने 11.32 सेकंदामध्ये 100 मीटरची धावण्याची शर्यत जिंकली होती. आज तिचा वाढदिवस असून या निमित्ताने तिच्या करीयरमधल्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.

दुती चंदने मिळवलेलं यश

दुतीला वर्ष 2019 मध्ये प्रतिष्ठीत स्टार मॅगझीनच्या 100 उदयोन्मुख स्टार्सच्या यादीत स्थान मिळाले होते.

वर्ष 2018 मध्ये आशियाई स्पर्धेत दुतीने भारतासाठी दोन रौप्यपदक जिंकली. 100 आणि 200 मीटर स्पर्धेत तिला ही मेडल्स मिळाली होती. 1986 च्या आशियाई स्पर्धेत पी.टी. उषा यांच्यानंतर आशियाई स्पर्धेत मिळालेले हे दुसरे रौप्यपदक आहे.

वर्ष 2017 मध्ये आशियाई एथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 100 मीटर आणि 100 मीटर रिलेमध्ये दोन कास्यपदक मिळवली.

2016 च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत 100 मीटर इवेंटमध्ये सहभागी होणारी दुती तिसरी भारतीय महिला खेळाडू बनली.

2013 च्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत ज्यूनियर खेळाडू असूनही तिने सीनियर स्तरावर सहभागी होऊन, कास्यपदक जिंकले होते.

2012 मध्ये दुती राष्ट्रीय चॅम्पियन बनली. तिने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 11.8 सेकंदाचा रेकॉर्ड बनवला होता.

दुतीने पुणे आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत कास्यपदक मिळवलं.

2007 मध्ये दुतीने राष्ट्रीय स्तरावर पहिलं मेडल मिळवलं होतं.