कोल्हापुरात फुटबॉल मॅचच्या फायनलमध्ये राडा, खेळाडू भिडले, छत्रपती मालोजीराजेंना करावी लागली मध्यस्थी

| Updated on: May 26, 2022 | 8:18 PM

प्रशिक्षकांबरोबर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंची बाचाबाची झाली. त्यातून खेळाडू परस्परांना भिडले. धक्काबुक्की केली.

कोल्हापुरात फुटबॉल मॅचच्या फायनलमध्ये राडा, खेळाडू भिडले, छत्रपती मालोजीराजेंना करावी लागली मध्यस्थी
Kolhapur Football Final
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई: कोल्हापुरात (kolhapur) शाहू कृतज्ञतापर्व सुरु आहे. त्या निमित्ताने फुटबॉल स्पर्धेच (Football Tournament) आयोजन करण्यात आलं होतं. आज स्पर्धेचा अंतिम सामना होता. यावेळी खेळाडूंमध्ये जोरदार वादावादी (Fight) झाली. पीटीएम आणि शिवाजी मंडळ यांच्यात अंतिम सामना सुरु होता. त्यावेळी बॉल पासिंगवरुन वादावादी सुरु झाली.

प्रशिक्षकही या वादात उतरले. त्यावेळी प्रशिक्षकांबरोबर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंची बाचाबाची झाली. त्यातून खेळाडू परस्परांना भिडले. धक्काबुक्की केली. मैदानावरील वाद वाढत असल्याचं पाहून खुद्द छत्रपती मालोजीराजे यांना मध्यस्थी करण्यासाठी मैदानात यावं, लागलं.

ते हा अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. या वादामुळे पंचांनी मैदानावरील दोन्ही संघाकडील एका खेळाडूला रेड कार्ड दाखवलं. या भांडणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.