पुण्यातील कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरींचा सहभाग

| Updated on: Nov 29, 2022 | 4:49 PM

नरसिंग यादव विजयी, हर्षवर्धन सदगीर पराभूत

पुण्यातील कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरींचा सहभाग
Maharashtra Kesari
Follow us on

संजय दुधाणे, पुणे: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पुण्यात राज्य निवड चाचणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचे गतविजेते सहभागी झाले आहेत. खुल्या 125 किलो वजनी गटात हर्षवर्धन सदगीरला पराभवाचा धक्का बसला तर ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवने 74 किलो गटात 4 लढती जिंकून राष्ट्रीय स्पर्धेत मजल मारली आहे.

कुठे होणार स्पर्धा ?

प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा शरद पवार गट घेणार की, रामदास तडस गट? या वादावर मागच्या आठवड्यात भारतीय कुस्ती महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली. संजयकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली अस्थायी समिती महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेईल. पुण्यातील तडस गटाकडून होणारी स्पर्धा अस्थायी समिती घेणार आहे.

स्पर्धेच आयोजन कोण करणार?

नगरच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर बंदीची कारवाई होऊ शकते. पुण्यातील स्पर्धेची घोषणा आधीच झाली होती. माजी महापौर मुरलीधर मोहोळ या स्पर्धेच आयोजन करणार होते. या स्पर्धेची निवड चाचणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र केसरी ही कुस्तीमधील मोठी मानाची स्पर्धा आहे. राज्यभरातील कुस्ती शौकीनांच या स्पर्धेकडे लक्ष असतं.