John Reid | न्यूझीलंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू जॉन रीड यांचं निधन

| Updated on: Oct 14, 2020 | 7:16 PM

जॉन रीड यांनी आपल्या नेतृत्वात न्यूझीलंडला कसोटीतील पहिला विजय मिळवून दिला होता.

John Reid | न्यूझीलंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू जॉन रीड यांचं निधन
Follow us on

ऑकलंड : न्यूझीलंडचे (New Zealand) माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार जॉन रीड (John Reid) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबतची माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरद्वारे दिली आहे. मात्र यामध्ये रीड यांचे निधनाचं कारण सांगण्यात आले नाही. रीड यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. रीड हे 1950-60 च्या दशकातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते. New Zealand Former Captain john Reid Passed Away At 92

जॉन रीड यांच्याकडे जेव्हा न्यूझीलंड संघाची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा न्यूझीलंड लिंबूटिंबू संघ होता. मात्र रीड यांनी आपल्या नेतृत्वात न्यूझीलंडला कसोटीतील पहिला विजय मिळवून दिला होता. रीड यांनी आपल्या नेतृत्वात 1956 मध्ये वेस्टइंडिजचा पराभव केला होता.

जॉन रीड यांची क्रिकेट कारकिर्द

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 246 सामने खेळले. यात त्यांनी 41.35 च्या एवरेजने 16 हजार 128 धावा केल्या. यामध्ये 39 शतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी 22.60 च्या सरासरीने 466 विकेट्सही घेतल्या होत्या.

रीड यांनी 1949 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलं. त्यांनी न्यूझीलंडसाठी एकूण 58 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलं. या 58 सामन्यात रीड यांनी 33.28 च्या सरासरीने 3 हजार 428 धावा केल्या. रीड यांनी एकूण 6 शतकं लगावली. 142 ही त्यांची टेस्टमधील सर्वोच्च धावसंख्या होती. ही सर्वोच्च खेळी त्यांनी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 1961 मध्ये केली होती. तर 85 विकेट्सही त्यांनी घेतल्या होत्या. रीड यांनी 1965 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रीड यांनी अनेक पदं भूषवली. ते काही काळ न्यूझीलंडच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी सामनाधिकारी पदाची जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली. आयसीसीने जॉन रीड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आयसीसीने एका ट्विटद्वारे जॉन रीड यांचा फोटो शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

Dean Jones | IPL कॉमेंट्रीसाठी मुंबईत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचा मृत्यू

New Zealand Former Captain john Reid Passed Away At 92