अंकिता रैनाची घोडदौड सुरुच, वर्षअखेपर्यंत तिसरं डबल्स पटकावलं

भारताची आघाडीची टेनिसपटू अंकिता रेनाने दुबईत कॅटरीन गोर्गोद्जेसह अल हबटूर ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. अंकिताने या वर्षात तिसऱ्यांदा डिबल्सचं जेतेपत पटकावलं आहे.

अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 13, 2020 | 4:39 PM
1 / 5
भारताची आघाडीची टेनिसपटू अंकिता रेनाने दुबईत कॅटरीन गोर्गोद्जेसह अल हबटूर ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. अंकिताने या वर्षात तिसऱ्यांदा डिबल्सचं जेतेपत पटकावलं आहे.

भारताची आघाडीची टेनिसपटू अंकिता रेनाने दुबईत कॅटरीन गोर्गोद्जेसह अल हबटूर ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. अंकिताने या वर्षात तिसऱ्यांदा डिबल्सचं जेतेपत पटकावलं आहे.

2 / 5

अंकिता-कॅटरीनच्या जोडीने शनिवारी 100,000 डॉलर इतकी बक्षिसाची रक्कम असलेल्या हार्ड कोर्ट टुर्नामेंटच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या अलियोना बोलसोव्ह जादोइनोव्ह आणि स्लोव्हाकियाच्या काजा जुवान या जोडीवर 6-4, 3-6, 10-6 अशा सेटमध्ये मात केली.

3 / 5

अंकिताने या सत्रात अंतिम फेरी गाठलेली ही चौथी स्पर्धा होती. परंतु आतापर्यंतच्या स्पर्धांपैकी ही स्पर्धा सर्वात मोठी होती. कारण यापूर्वी तिने जिंकलेल्या स्पर्धांमधील बक्षिसांची रक्कम 25 हजार डॉलर्स इतकी होती.

4 / 5

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अंकिताने तीन वेगवेगळ्या स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. यामध्ये तिने बिबियाने शूफ्ससह थाईलंडच्या नोंथाबुरीमध्ये लागोपाठ दोन स्पर्धा जिंकल्या.

5 / 5

दरम्यान, जोधपूरमध्ये पार पडलेल्या टेनिस स्पर्धेत तिने भारताची टेनिसपटून स्नेहल मानेसह अंतिम फेरी गाठली. पंरतु अंतिम फेरीत अंकिता-स्नेहल जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us