Jyothi Yarraji Wins Gold : एशियन गेम्समध्ये एकाच दिवशी 3 सुवर्ण, पोरगी वाऱ्यासारखी पळाली, पाहा Video

| Updated on: Sep 26, 2023 | 1:48 PM

Jyothi Yarraji Gold Asian Game 2023 : एशियन गेम्समध्ये भारतासाठी दुसऱ्या दिवस चांगला गेला आहे. आजच्या दिवशी भारताने एक दोन नाहीतर तीन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्यासोबतच कांस्यपदकही जिंकलं आहे.

Jyothi Yarraji Wins Gold : एशियन गेम्समध्ये एकाच दिवशी 3 सुवर्ण, पोरगी वाऱ्यासारखी पळाली, पाहा Video
Follow us on

मुंबई : थायलंडमध्ये सुरू असलेल्या 25 व्या एशियन गेम्स 2023 मध्ये भारताने दुसऱ्या दिवशी एक दोन नाहीतर तीन सुवर्ण पदके जिंकली आहेत. त्यासोबतच कांस्यपदकावरही भारतीयांनी नाव कोरलं आहे. ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 100 हर्डल्स म्हणजेच अडथळा शर्यतीमध्ये आंध्र प्रदेशच्या ज्योती यारराजीसोबत अजय कुमार आणि अब्दुल्ला अबुबकरल यांनी देशाला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.

ज्योती यारराजीने महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत 13.09 सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत जपानची मौसुमी ओकी दुसऱ्या स्थानावर राहिली, तिने 13.12 सेकंदात शर्यत पूर्ण केली. अजय कुमार सरोज याने 3.41.51 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. अजयलाही जपानच्या युशुकी ताकाशी याने टक्कर दिली होती. तोसुद्धा 3.42.04 सेकंदांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर राहिला.

 

भारताला तिसरं सुवर्ण हे तिहेरी उडीमध्ये मिळालं, तिहेरी उडीमध्ये भारताच्या अब्दुल्ला अबुबकर याने 16.92 मीटर लांब उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतासाठी तिन्ही सुवर्णपदके जिंकलीच त्यासोबत दोन कांस्यपदकावरही नाव कोरलं. यामध्ये भारताच्या ऐश्वर्या मिश्रा हिने महिलांच्या 400 मीटर शर्यतीमध्ये दुसरा नंबर पटकावला तर तेजस्वीन शंकरने डेकॅथलॉन स्पर्धेत 7527 गुण मिळवून जिंकला. भारताने पहिल्या दिवशी एक कांस्यपदक जिंकलं होतं जे अभिषेक पाल याने 10 हजार मीटर शर्यतीत मिळवून दिलं होतं.

 

दरम्यान, भारतीय महिला संघानेही फायनलमध्ये श्रीलंका संघाचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 97 धावांवरच रोखलं होतं.