Asian Games 2023 स्पर्धेतील घोडस्वारीत भारताला गोल्ड मेडल, सुवर्ण कामगिरीचं सर्वत्र कौतुक

| Updated on: Sep 26, 2023 | 4:54 PM

Asian Games India Won Gold : एशियन गेम्स स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी सुरु झाली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आणि एका गोल्ड मेडलची कमाई केली आहे. भारताच्या घोडस्वारी संघाने ही चमकदार कामगिरी केली आहे.

Asian Games 2023 स्पर्धेतील घोडस्वारीत भारताला गोल्ड मेडल, सुवर्ण कामगिरीचं सर्वत्र कौतुक
Asian Games 2023 स्पर्धेतील घोडेस्वारीत टीम इंडियाने रचला इतिहास, 41 वर्षानंतर जिंकलं सुवर्ण पदक
Follow us on

मुंबई : एशियन गेम्स 2023 स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. भारताने तिसऱ्या दिवशी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारताचं या स्पर्धेतील तिसरं गोल्ड पदक आहे. भारताने 41 वर्षानंतर घोडस्वारीत गोल्ड मेडलची कमाई केली आहे. भारताने 1982 नंतर पहिल्यांदा घोडस्वारीत सुवर्ण पदक जिंकलं आहे. या प्रकारात भारताला गोल्ड मेडल अशी कोणतीच आशा नव्हती. पण भारतीय खेळाडूंनी गोल्ड मेडल कमाई करून दाखवली. सांघिक घोडस्वारीत हे पदक मिळेलं आहे. यात सुदीप्ती हाजेला, दिव्यकीर्ती सिंह, हृदय छेदा आणि अनुश अग्रवाल अशी घोडस्वारी संघातील खेळाडूंची नावं आहे. यासोबत भारताने सिंगल इव्हेंट स्पर्धेत रजत आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे.

सांघिक घोडस्वारी स्पर्धेत टीमने 209.205 गुणांची कमाई केली. यात दिव्यकीर्ती 68.176, हृदय 69.941 आणि अनुशने 71.088 गुण मिळवले. भारतीय संघाने चीनला 4.5 गुणांनी मात दिली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनला 204.882 गुण, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगला 204.852 गुण मिळाले. चीने ताइपे चौथ्या आणि यूएईची टीम पाचव्या स्थानावर राहिली.

भारताच्या महिला क्रिकेट संघाने यापूर्वी गोल्ड मेडल पटकावलं आहे. अंतिम सामन्यात श्रीलंकेला 19 धावांनी पराभूत करत सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच भारताने नेमबाजीत गोल्ड जिंकलं आहे. टीम इंडियाने सेलिंगमध्ये 2 ब्रॉन्झ पदक कमावले आहेत. आतापर्यंत भारताने 14 पदकांची कमाई केली आहे. 3 गोल्ड, 4 सिल्व्हर आणि 7 ब्रॉन्झ मेडलची कमाई झाली आहे.

या खेळातून भारताला सुवर्ण पदकाची आशा

एशियन गेम्स 2023 स्पर्धेत आणखी काही क्रीडा प्रकारातून सुवर्ण पदकाची आशा आहे. त्या दृष्टीने आगेकूच सुरु असल्याचं दिसत आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने सिंगापूरला 16-1 च्या मोठ्या फरकाने पराभूत केलं. स्क्वॅशमध्ये महिला खेळाडूंनी पाकिस्तानला 3-0 ने पराभूत केलं. स्क्वॅशमध्ये पुरुष संघानेही 3-0 ने विजय मिळवला. त्यासोबर वॉलिबॉल स्पर्धेवर नजर असेल. पाचव्या पोझिशनसाठी पाकिस्तान विरुद्ध सामना असेल.