IKF S3 Final : भारतीय फुटबॉलपटूंचं स्वप्न सत्यात उतरणार, क्लब अकादमींनी निवडले भविष्यातील खेळाडू

| Updated on: Feb 09, 2024 | 10:13 PM

इंडिया फुटबॉल खेलो अंतर्गत तिसऱ्या पर्वाची नुकतीच सांगता झाली आहे. देशभरातील कानकोपऱ्यातून 150 खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड केली होती. निवडलेले हिरे क्लब अकादमींनी पारखले आणि आता त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैलू पाडला जाणार आहे. इंडिया फुटबॉल खेलोच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खेळाडूंना व्यासपीठ मिळालं आहे.

IKF S3 Final : भारतीय फुटबॉलपटूंचं स्वप्न सत्यात उतरणार, क्लब अकादमींनी निवडले भविष्यातील खेळाडू
IKF S3 Final : भारतीय फुटबॉलपटूंना मिळालं हक्काचं व्यासपीठ, पुढील वाटचालीसाठी क्लब आणि अकादमींची लागणार मोहोर
Follow us on

मुंबई : भारताची फुटबॉल क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून प्रगती होताना दिसत आहे. फुटबॉलची लोकप्रियता फीफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अनेक देशांनी अनुभवली आहे. त्यामुळे भविष्यात भारत या स्पर्धेत फुटबॉल खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. आता त्या दृष्टीने भारतात फुटबॉलची पायभरणी केली जात आहे. इंडिया फुटबॉल खेलोच्या तिसऱ्या पर्वात याची झलक दिसली. देशातील कानाकोपऱ्यातून 150 प्रतिभावन फुटबॉलपटूंची अहमदाबाद येथे झालेल्या ग्रँड फिनालेसाठी निवड केली होती. यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून चाचण्या घेतल्या जात होत्या.भारत आणि यूएईमधील 50 शहरे आणि गावांमध्ये आयोजित केलेल्या शारीरिक चाचण्यांमध्ये 2006 ते 2011 दरम्यान जन्मलेल्या मुलांचा आणि 2007 ते 2011 दरम्यान जन्मलेल्या मुलींचा सहभाग होता. 10 हजारांहून अधिक खेळाडूंनी यात भाग घेतला होता. त्यापैकी 150 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. निवडलेल्या खेळाडूंची  क्लब आणि अकादमीने भविष्याच्या दृष्टीने पारख केली. त्यांना पुढील वाटचालीसाठी एक नवं व्यासपीठ मिळणार आहे. खऱ्या अर्थाने भविष्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे.

प्रतिभावान फुटबॉलपटूंचा शोध घेण्यासाठी एकूण वीसहून अधिक प्रतिस्पर्धी क्लब आणि अकादमींनी भाग घेतला होता. फुटबॉल खेळाडूंना इंडियन सुपर लीग (ISL) आणि आय-लीग क्लबशी थेट जोडण्यासाठी आता पुढची वाटचाल सुरु झाली आहे. जमशेदपूर एफसी, केरळ ब्लास्टर्स, गोवा एफसी, मुंबई सिटी एफसी, चेन्नईयिन एफसी आयएसएल क्लब फायनलमध्ये सहभागी झाले होते. गोकुलम केरळ, दिल्ली एफसी, बडोदा एफएआरए, महाराष्ट्र ऑरेंज एफसी, युनायटेड एससी कोलकाता, मिल्लत एफसी आय लीग क्लब्सने सहभाग नोंदवला होता.

एफसी मद्रास, झिंक FA, अल्फा स्पोर्ट्स अकादमी, Ardor FA, विशाल बिहार युनायटेड, स्पोर्टटो, नॉर्दर्न युनायटेड या अकादमींनी भाग घेत खेळाडूंची पारख केली. आता पारख खेळाडूंची यादी इंडिया फुटबॉलकडे सादर केली जाईल. झिंक फुटबॉल अकादमीने 23, युनायटेड एससी 7, ARA FC 6, गोवा एफसी 1 आणि एफसी मद्रास 1 खेळाडूची निवड केली आहे. अजूनही इतर अकादमी आणि क्लब आपल्या निवडलेल्या खेळाडूंची यादी सोपवतील. निवड झालेल्या खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी प्रयत्न केले जातील.