Euro 2020 : बाद फेरीचं गणितं ठरलं, ‘हे’ 16 संघ पुढील फेरीत दाखल

| Updated on: Jun 24, 2021 | 7:26 PM

फुटबॉल जगतातील अत्यंत महत्त्वाची आणि मानाची स्पर्धा असणारी युरो चषक स्पर्धा आता हळूहळू अंतिम सामन्याच्या दिशेने आगेकुच करत आहे. बुधवारी फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्यातील सामना अनिर्णीत सुटल्यानंतर दोन्ही संघ पुढील फेरीत गेले आहेत. त्यामुळे राउंड 16 चं गणित आता उलगडलं आहे.

Euro 2020 : बाद फेरीचं गणितं ठरलं, हे 16 संघ पुढील फेरीत दाखल
Uefa euro cup 2020
Follow us on

मुंबई : युरोपियन देशात सुरु असलेली युरो चषक 2020 (Euro 2020) ही जागतिक फुटबॉल स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. आता स्पर्धेत पुढील फेरीत पोहोचलेले 16 संघ समोर आले आहेत. या 16 संघामध्ये शनिवारपासून बाद फेरीचे सामने सुरु होणार आहेत. बुधवारी फ्रान्स आणि पोर्तुगाल या बलाढ्य संघात झालेला सामना ड्रॉ झाल्याने दोन्ही संघ पुढील फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे एफ गटातून जर्मनीसह एकूण तीन संघ पुढील फेरीत पोहोचले आहेत. (In Euro 2020 Round 16 matches will start soon After France vs Portugal match tied both teams goes in next round)

बाद फेरीत पोहोचलेले संघ

सुरुवातीपासून अप्रतिम खेळी करत एकही पराभव न पत्करणाऱ्या इटली, बेल्जियम, नेदरलँड हे संघ सर्वांत आधी बाद फेरीत पोहोचले. त्यानंतर क्रोएशिया, डेन्मार्क, युक्रेन, चेक रिपब्लिक, स्वीडन, वेल्स, स्पेन, इंग्लंड, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या संघांनी बाद फेरीत जागा मिळवली. ज्यानंतर अखेर एफ गटातून जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल आणि हंगेरी यांच्यातील उत्तम कामगिरी करणारे संघ बाद फेरीत पोहोचणार होते. मात्र पोर्तुगाल आणि फ्रान्स यांच्यातील सामना ड्रॉ झाल्याने हे दोन्ही संघ पुढील फेरीत पोहोचले. तर हंगेरी आणि जर्मनी यांच्यातील सामनाही ड्रॉ झाला मात्र गुणांच्या जोरावर जर्मनीने बाद फेरीत धडक मारली.

असे असतील बाद फेरीतील सामने

  • वेल्स विरुद्ध डेन्मार्क (२६ जून)
  • इटली विरुद्ध ऑस्ट्रिया (२७ जून)
  • नेदरलँड विरुद्ध चेक रिपब्लिक (२७ जून)
  • बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल (२८ जून)
  • क्रोएशिया विरुद्ध स्पेन (२८ जून)
  • फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड (२९ जून)
  • इंग्लंड विरुद्ध जर्मनी (२९ जून)
  • स्वीडन विरुद्ध युक्रेन (३० जून)

हे ही वाचा :

सर्जियो रामोसचा रिअल माद्रिदला अलविदा, 16 वर्षांच्या कराराचा अंत, 22 महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकवून देणारा कर्णधार

Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

(In Euro 2020 Round 16 matches will start soon After France vs Portugal match tied both teams goes in next round)