सर्जियो रामोसचा रिअल माद्रिदला अलविदा, 16 वर्षांच्या कराराचा अंत, 22 महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकवून देणारा कर्णधार

रामोसने 2005 मध्ये रिअल माद्रिद क्लब जॉईन केला होता. त्याने संघासाठी एकूण 671 सामने खेळले असून 101 गोल देखील केले आहेत.

सर्जियो रामोसचा रिअल माद्रिदला अलविदा, 16 वर्षांच्या कराराचा अंत, 22 महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकवून देणारा कर्णधार
सर्जियो रामोस

माद्रिद : जागतिक फुटबॉलमधील सर्वात मानाच्य क्लब्सपैकी एक असणाऱ्या रिअल माद्रिद (Real Madrid) संघाचा कर्णधार सर्जियो रामोसने (Sergio Ramos) नुकताच संघासोबतचा करार संपवत क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 16 वर्ष संघासोबत असणाऱ्या सर्जियोने संघाला 22 महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिला. ज्यामध्ये 4 चॅम्पियन्स लीग, 5 ला लीगाच्या चषकांचाही समावेश आहे. बुधवारी 17 जूनला पत्रकर परिषदेत रामोसने ही घोषणा केली. रिअल माद्रीद संघ व्यवस्थापनाकडूनही या बातमीची पुष्टी केली आहे.

सर्जियो रामोसने 2005 साली रिअल माद्रिद संघ जॉईन केला होता. सर्जिओने संघाकडून 671 सामने खेळले आहेत. एक डिफेन्डर असणाऱ्या सर्जियोने 101 गोल देखील केले आहेत. एखाद्या डिफेन्डरकडून इतके गोल होणे एक महत्त्वाची गोष्ट असून रामोस ज्याप्रकारे हेडरद्वारे गोल करायचा त्याची चर्चा कायम असायची. सध्या सुरु असलेल्या सीजनमध्ये रामोस आधी कोरोना आणि नंतर पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही.

करार न पटल्याने घेतला निर्णय

सर्जियो मागील बरीच वर्ष रिअल माद्रिद संघाकडून खेळत आहे. त्यांचा करार विशिष्ट काळानंतर रिन्यूव होत असतो. मात्र यंदाच्या करारावर सर्जियो आणि संघ व्यवस्थापनात सहमती झाली नसल्याचं स्पॅनिश मीडियाकडून सांगण्यात आलं. याच कारणामुळे सर्जियोने करार संपवत संघ सोडण्याचा निर्णय घेतला. सर्जियोचा करार 30 जूनला संपत असून संघ पुढील एक वर्षाचा करार करण्याच्या तयारीत होता. पण सर्जियोला दोन वर्षांचा करार करण्याची इच्छा असल्यानं त्यांची सहमती झाली नाही आणि सर्जियोने संघ सोडण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावर चाहते भावूक

रिअल माद्रिद संघाचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्यामुळे संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू संघ सोडून जात असल्याने सर्वचजण भावूक झाले असून सोशल मीडियावर सर्जियोबद्दलच्या अनेक पोस्ट करुन चाहते त्याला फेअरवेल देत आहेत. त्यातीलच काही खास पोस्ट…

हे ही वाचा :

Euro 2020 : रोनाल्डो ठरला Successful, एकाच सामन्यात चार दमदार विक्रम नावावर

Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI