Euro 2020 : रोनाल्डो ठरला Successful, एकाच सामन्यात चार दमदार विक्रम नावावर

ख्रिस्तियानो रोनाल्डोने हंगेरी विरुद्धच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देत युरो चषकाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. त्याने युरोच्या इतिहासातील चार रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

Euro 2020 : रोनाल्डो ठरला Successful, एकाच सामन्यात चार दमदार विक्रम नावावर
ख्रिस्तियानो रोनाल्डो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jun 16, 2021 | 1:57 PM

बुडापेस्ट : युरो चषक 2020 (Euro Cup 2020) मध्ये मंगळवारी झालेल्या पोर्तुगाल (Portugal) विरुद्ध हंगेरी (Hungary) सामन्यात पोर्तुगालने 3-0 च्या फरकाने दमदार विजय मिळवला. या विजयात पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) दोन गोल करत संघाचा विजय पक्का करण्यासोबतच स्वत:ला युरो चषक स्पर्धेच्या इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू साबित केलं. (Cristiano Ronaldo Breaks Many Records Of Euro 2020 In Portugal vs Hungary Match)

मैदानात पाऊल ठेवताच पहिला रेकॉर्ड

रोनाल्डो सामना खेळण्यासाठी मैदानाच उतरला आणि युरो चषक स्पर्धेत 5 वेळा खेळणारा सर्वांत पहिला खेळाडू ठरला. 36 वर्षीय रोनाल्डो अजूनही फिट असल्याने संघात त्याच महत्त्वाचं स्थान आहे. तो पोर्तुगालचा कर्णधार असून 5 वेळा युरो चषकात खेळणारा पहिला पोर्तुगीजही ठरला आहे. तसेच पाचही वेळेस स्पर्धेमध्ये गोल करणारा ही रोनाल्डो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

युरो चषकाच्या इतिहासातील ऐतिहासिक कामगिरी

रोनाल्डोने 87 व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीने त्याचा पहिला आणि संघासाठी दुसरा गोल केला. याच गोलबरोबर युरो चषक स्पर्धेच्या इतिहासात रोनाल्डोचे 10 गोल झाले. त्यामुळे फ्रान्सचा माजी दिग्गज खेळाडू मिशेल प्लाटिनीचा (Michel Platini) 9 गोलचा रेकॉर्ड तोडून रोनाल्डो युरोमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. रोनाल्डोने सामन्यात आणखी एक गोल केल्याने त्याच्या नावे 11 गोल आहेत. विशेष म्हणजे पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात 106 गोल रोनाल्डोने केले असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. सोबतच एकाच सामन्यात 2 गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडूही रोनाल्डोच आहे. त्याने 36 वर्ष 130 दिवसांचा असताना मंगळवारी दोन गोल केले. याआधी हा रेकॉर्ड यूक्रेनच्या शेवचेंको याच्या नावावर होता. त्याने 2012 मध्ये 35 वर्षे 256 दिवसांचा असताना एकाच सामन्यात दोन गोल केले होते.

पोर्तुगालने 8 मिनिटांत फिरवला सामना

पोर्तुगाल (Portugal) आणि हंगेरी (Hungary) यांच्यातील सामना सुरुवातीला तसा चूरशीचा होताना दिसत होता. हंगेरीकडून जास्त हल्ले होत नसले तरी त्यांचा डिफेन्स अप्रतिम असल्याने पोर्तुगालला गोल करता येत नव्हता. हंगेरीने जास्त लक्ष रोनाल्डोवर दिल्याने त्यालाही सामन्यात काही जादू करता येत नव्हती. त्यामुळे पहिल्या हाल्फमध्ये दोन्हीही संघाना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे सामन्यच्या मध्यांतरादरम्यान स्कोर 0-0 होता. त्यानंतर दुसरा हाल्फही संपत आला सामना संपण्यासाठी 6 मिनिटं शिल्लक असतानाच पोर्तुगाच्या राफेल गुरेयराने (Raphael Guerreiro) अप्रतिम गोल करत पोर्तुगालला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हंगेरीच्या चूकीमुळे पोर्तुगालला एक पेनल्टी मिळाली. जी रोनाल्डोने अचूकरित्या घेत आघाडी 2-0 ची केली. त्यानंतर एक्स्ट्रा टाइममध्ये रोनाल्डोने आणखी एक गोल करत हंगेरीवर आणखी एक हल्ला केला आणि 3-0 च्या फरकाने एका दमदार विजयाची नोंद केली.

(Cristiano Ronaldo Breaks Many Records Of Euro 2020 In Portugal vs Hungary Match)

हे ही वाचा :

Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

Euro 2020 : इंग्लंडची क्रोएशियावर मात, ऑस्ट्रियाचाही जबरदस्त विजय

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें