मेस्सीने अश्रू पुसलेला टिशूपेपर विक्रीसाठी, ब्राझीलियन मॉडेलने लावली बोली, किंमत ऐकून चकीत व्हाल

| Updated on: Aug 24, 2021 | 4:19 PM

जागतिक फुटबॉलमधील स्टार खेळाडू लिओनल मेस्सीने 17 वर्ष बार्सिलोना संघाकडून खेळण्यानंतर अखेर क्लब सोडण्याचा निर्णय घेतला. पण निरोप समारंभावेळी मेस्सीला अश्रू अनावर झाले होते.

मेस्सीने अश्रू पुसलेला टिशूपेपर विक्रीसाठी, ब्राझीलियन मॉडेलने लावली बोली, किंमत ऐकून चकीत व्हाल
लिओनल मेस्सी बार्सिलोना संघ सोडत पीएसजी संघामध्ये सहभागी झाला आहे.
Follow us on

मुंबई : ‘फॅन्स’ आपल्या आवडत्या खेळाडूसाठी काय करतील आणि काय नाही याचा काहीच नेम नाही. मैदानात त्यांनी वापरलेल्या जर्सीपासून ते त्यांच्या अनेक वस्तूंसाठी चाहते कोटी रुपये मोजण्यासाठी तयार असतात. दरम्यान जागतिक फुटबॉलमधील एक सर्वात मोठं नाव म्हणजे लिओनल मेस्सीने (Lionel Messi) अश्रू पुसण्यासाठी वापरलेल्या टिशू पेपरसाठीही कोट्यवधींची बोली लागली आहे. 

अर्जेंटीना देशाचा असणाऱ्या मेस्सीचे चाहते जगभरातील सर्व देशात आहेत. भारतातही असंख्य फॅन्स असणाऱ्या मेस्सीने काही दिवसांपूर्वी 17 वर्षे खेळत असलेला बार्सिलोना क्लब (barcelona) सोडण्याचा निर्णय घेतला आणि जगभरातील चाहत्यांना अक्षरश: रडू कोसळलं. खुद्द मेस्सीही क्लब सोडतानाच्या समारंभात ढसाढसा रडला. ज्यानंतर त्याला त्याच्या पत्नीने अश्रू पुसण्यासाठी दिलेला टिशू पेपर मेस्सीने वापरल्यानंतर विक्रिकरता बोली लावण्यासाठी ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका महिला मॉडेलने या टिशूसाठी कोट्यवधींची बोली देखील लावली आहे. लॉना सॅन्डियन (launa sandien) असं तिचं नाव असून ती प्रसिद्ध मॅग्जिन प्लेबॉयसाठी फोटोशूट करते.

टिशूपेपरसाठी कोट्यवधींची बोली

एका अज्ञात व्यक्तीने मेस्सीने अश्रू पुसलेला टिशू पेपर माझ्याकडे असल्याचे सांगत त्याची ऑनलाईन जाहीरात टाकली. यासाठी बार्सिलोना क्लबची सुपर फॅन आणि प्लेबॉय मॉडेल लॉना सॅन्डियनने 4 कोटींहून अधिकची बोली लावली आहे.ती म्हणाली, ”मी या टीशूपेपरसाठी मी 6 लाख डॉलर (अंदाचे 4 कोटी भारतीय रुपये) इतकी बोली लावली आहे पण आता संबधित जाहीरात दिसेत नसून मला आशा आहे मी ही बोली जिंकले असून मला हा टिशूपेपर मिळेल.”

हे ही वाचा

Lionel messi barcelona : 17 वर्षांचा प्रवास संपला, लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला रामराम!

दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

(Lionel Messis Used Tissue From Barcelona Farewell Speech is On Sale Model Named launa sandien wants to buy it)