AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lionel messi barcelona : 17 वर्षांचा प्रवास संपला, लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला रामराम!

जागतिक फुटबॉलमधील एक मोठं नाव असणाऱ्या लिओनल मेस्सीने बार्सिलोना क्लबला अलविदा करण्याचा निर्णय़ घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या या चर्चेची संघाने स्वत: ट्विट करत पुष्टी केली आहे.

Lionel messi barcelona : 17 वर्षांचा प्रवास संपला, लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला रामराम!
लिओनल मेस्सीचा बार्सिलोना संघाला अलविदा
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 1:10 AM
Share

मुंबई : तब्बल 17 वर्ष, 778 सामने, 672 गोल्स आणि 35 चषक मिळवून दिल्या नंतर लिओनल मेस्सी आणि बार्सिलोना हे सुरेख समीकरण अखेर संपुष्टात आलं आहे. अवघ्या 13 वर्षांचा असताना बार्सिलोना संघाकडून खेळू लागलेल्या लिओनल मेस्सीने (Lionel Messi) अखेर स्पॅनिश क्लब बार्सिलोना (barcelona) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच बार्सिलोना क्लबने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली. (Lionel Messi will leave FC Barcelona News Confirmed by Club)

बार्सिलोना क्लबने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, ‘मेस्सीचे क्लबसोबतचा करार संपला असून आता नवीन करार तयार करण्यात येत होता. पण क्लब आणि खेळाडू यांच्यात नवीन करारातील आर्थिक आणि संरचनात्मक अडथळ्यांमुळे हा करार होऊ शकला नाही. ज्यामुळे मेस्सी यापुढे संघाकडून खेळणार नाही.’ या सोबतच संघाने मेस्सीला त्याच्या पुढील वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत.

बार्सिलोना संघाची मेस्सीच्या उपचारासाठी मदत

लिओनल मेस्सी अवघ्या 6 वर्षांचा असताना अर्जेंटिनाच्या रोजारियो येथील ‘न्यूएल्स ओल्ड बॉयज क्लब’ सोबत जोडला गेला. वडिलांनी फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरणा दिलेल्या मेस्सीसोबत दररोज सरावासाठी त्याची आज्जी सोबत असायची. बालपणीपासूनच अथक मेहनत करणाऱ्या मेस्सीला अवघ्या 10 वर्षांचा असताना ‘ग्रोथ हार्मोन डिफिशिएन्सी’ या गंभीर आजाराने ग्रासलं. या आजारात व्यक्तीची शाररिक वाढ खुंटते. त्यामुळे हा आजार मेस्सीवर पूर्णपणे हावी झाला असता तर मेस्सी कधीच फुटबॉल खेळू शकला नसता. आजाराचा खर्चही खूप असल्याने मेस्सीची फॅमिली चिंतेत होती.

त्यावेळी मेस्सीचा अप्रतिम खेळ पाहून बार्सिलोना संघाने त्याला खेळण्याची ऑफर दिली आणि उपचाराचा खर्च उचलणार असल्याचेही कबूल केले. त्यानंतर मेस्सी बार्सिलोनासोबत जोडला गेला साध्या टिशू पेपरवर मेस्सीला पहिलं कॉन्ट्रेक्ट लिहून दिलं आणि 14 वर्षांचा मेस्सी बार्सिलोनामध्ये सामिल झाला. त्यानंतर मेस्सीने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि बघता बघता यशाची एक एक शिखरं सर केली आणि संघासह स्वत:ला सर्वोच्च स्थानी पोहोचवलं. आज हा महान प्रवास संपला असून मेस्सी यापुढे बार्सिलोनाच्या जर्सीत कधीच खेळताना दिसणार नाही.

हे ही वाचा

दहाव्या वर्षी उपचारासाठी मदत, 20 वर्षांपासून तोच संघ, कोट्यवधींच्या ऑफर्स धुडकावल्या

(Lionel Messi will leave FC Barcelona News Confirmed by Club)

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!