मोदी सरकारकडून आदिवासी समाजाला…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट बोलले
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं.

गडचिरोलीत जनजातीय गौरव दिवसानिमित्त ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दिनानिमित्त विदर्भात विशेष कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील कार्यक्रमात फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री पोहोचले आहेत. या विशेष कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाबाबत मोठं भाष्य केलं.
उपमुख्य एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो. बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी आदिवासी जनजातीय दिवस असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात हा दिवस देखील साजरा करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाला मोदी हे ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. आदिवासी समाजाला न्याय देण्याचा काम मोदी सरकार करतंय. आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे. यासाठी जसं बिरसा मुंडा यांनी 25 व्या वर्षी देशासाठी बलिदान दिलं. अशा या खऱ्या अर्थाने त्यांना धरती आबा पदवी बहाल करण्यात आली. मोदी सरकारकडून आदिवासी समाजाला पाठबळ दिलं जातंय’.
‘आदिवासी समाज त्यांना देव मानत होता. फक्त त्यांच्या पुतळ्याला हार न घालता, आदिवासी बांधवाच्या आयुष्यात चांगले दिवस, विकासाचे दिवस, जीवनात बदल घडवण्याचे काम पंतप्रधान मोदी करत आहेत. आदिवासी जनजातीय दिवस साजरा होतोय. त्यांनी आदिवासी समाजासाठी विविध योजना असतील, अनेक निर्णय हे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घेतले. वनपट्टे , आदिवासी हक्क देण्याचे काम सरकार करतं. आदिवासीच्या विकासाठी सरकार काम करतंय. आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील पदी विराजमान झाल्या. नरेंद्र मोदी हे व्हीसी द्वारे उपस्थित राहतील, असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसांच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. जनजातीय गौरव दिवस आणि भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे ९:३० वाजता पोलीस मुख्यालय गडचिरोली निघणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आदिवासी मंत्री, राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यातून आलेले आदिवासी नागरिक कला नृत्य सादर करणार आहेत. गडचिरोली जिल्हा दुर्गम भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री थांबलेल्या ठिकाणात पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला आहे.
