PHOTO : अमित ठाकरे राजकारणाच्या मैदानातून थेट फुटबॉलच्या मैदानात, भर चिखलात लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद

| Updated on: Aug 21, 2021 | 12:10 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आज मनसोक्त फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. एका फुटबॉल सामन्याचे उद्घाटन करण्यासाठी आले असताना अमित यांना स्वत:ही फुटबॉल खेळले.

1 / 6
राजकारणी म्हटलं की कायम विचाराधीन, पांढरे शुभ्र कपडे आणि कामांमध्ये व्यस्त असचं व्यक्तीमत्त्व समोर येतं. पण या सर्वाला छेद देत महाराष्ट्रातील एक तरुण नेतृत्त्व असणारे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी थेट फुटबॉलच्या मैदानात उतरत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.

2 / 6
मनसे पक्षाचे माहीम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी आयोजित केलेल्या फुटबॉल सामन्यांचे उद्घाटन करण्यासाठी आले असताना अमित यांना स्वत:लाही फुटबॉल खेळण्याचा मोह आवरला नसल्याने त्यांनी थेट मैदानात उतरत फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली.

3 / 6
तर अमित यांनी आनंद लुटलेला हा सामना झाला तो मुंबईच्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात. अमित यांनी श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाचे प्रतिनिधित्व करत फुटबॉलचा आनंद लुटला.

4 / 6
रिमझिम पावसात सुरू असलेल्या सामन्यात अमित ठाकरे अप्रतिम खेळाचे दर्शन घडवले. त्यांनी काही उत्तम असे पास देत काही असिस्ट देखील केले. तर स्वत:ही दोन गोल लगावत संघाला विजय मिळवून दिला.

5 / 6
अमित ठाकरे यांच्या उत्तम खेळामुळे ते खेळत असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाने वांद्रे फुटबॉल संघावर अप्रतिम विजय मिळवला.

6 / 6
मागील काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होत असलेल्या अमित यांना सुुरुवातीपासून खेळाची आवड आहे. याआधीही ते वडिलांसोबत टेनिससारखे खेळ खेळताना दिसून आले आहेत. त्यानंतर आज त्यांनी फुटबॉलचा आनंद लुटत पुन्हा एकदा राजकारणी व्यक्तीमत्त्वामागे दडलेल्या खेळाडूचे दर्शन घडवले.