Viral Video : या खेळाडूने खेचले एका ओव्हरमध्ये 5 सिक्स, पाहा व्हिडीओ

| Updated on: Sep 22, 2022 | 5:25 PM

वेस्टइंडिज टीमचा ऑलराउंडर ओडिन स्मिथने सुद्धा चांगली बॅटिंग केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Viral Video : या खेळाडूने खेचले एका ओव्हरमध्ये 5 सिक्स, पाहा व्हिडीओ
या खेळाडूने खेचले एका ओव्हरमध्ये 5 सिक्स, पाहा व्हिडीओ
Image Credit source: twitter
Follow us on

पुढच्या महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या (World Cup 2022) आगोदर सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. कारण कोणता खेळाडू (Player) कशी कामगिरी करणार यावर सोशल मीडियावर (Social Media) चर्चा सुरु झाली आहे. देशातल्या जेवढ्या टीम सहभागी होणार आहेत. त्यांनी टीममध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची यादी आसीसीकडे दिली आहे. त्यामुळे सामने कधी सुरु होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

वेस्टइंडिज टीमचा ऑलराउंडर ओडिन स्मिथने सुद्धा चांगली बॅटिंग केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याने एका ओव्हरमध्ये पाच सिक्स लगावले आहेत.

कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना त्याने हा कारनामा केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मिगल प्रिटोरियसला हे षटकार मारले आहेत. त्यामुळे तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

आशिया चषकात विराट कोहलीली सुद्धा चांगली लय सापडली होती. परंतु दोन दिवसांपुर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो देखील पटकन बाद झाला.