Tokyo Olympic 2021 : यंदाच्या ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत कोणाला कोणतं पदक?, जाणून घ्या सर्व तपशील

| Updated on: Aug 06, 2021 | 6:35 PM

रत ने टोक्यो ओलिंपिक-2020 (Tokyo Olympics-2020) में कांस्य पदक जीत अपने चार दशक के ओलिंपिक पदक के सूखे को खत्म किया है

Tokyo Olympic 2021 : यंदाच्या ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत कोणाला कोणतं पदक?, जाणून घ्या सर्व तपशील
टोक्यो ऑलिम्पिक हॉकी निकाल
Follow us on

Tokyo Olympic 2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) हॉकी स्पऱ्धेत बेल्जियमने सुवर्णपदक जिंकल. पण खरी मनं जिंकली भारतीय संघाने. एकेकाळी ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे बादशाह असणारे भारतीय मागील 41 वर्षे पदकाच्या प्रतिक्षेत होते. ती प्रतिक्षा अखेर संपली आणि भारताने जर्मनीला 5-4 ने नमवत कांस्य पदक खिशात घातलं. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

महिलांचा विचार करता नेदरलँड संघाने सुवर्ण पदक तर अर्जेंटीना आणि ग्रेट ब्रिटनने अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरले. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकलेल्या नेदरलँडच्या महिलांनी 2008 आणि 2012 प्रमाणे यंदाही सुवर्णपदक मिळवलं.

पुरुष वर्ग

अंंतिम सामन्यात बेल्जियमने ऑस्ट्रेलिया संघाला पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 ने नमवत सुवर्णपदक जिंकलं.

कांस्य पदकाच्या सामन्यात भारताने जर्मनी संघाला 5-4 ने मात देत 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक मिळवलं.

सुवर्ण पदक – बेल्जियम
रौप्य पदक- ऑस्ट्रेलिया
कांस्य पदक- भारत

महिला वर्ग

नेदरलँडच्या महिलांनी अर्जेंटीना संघाला 3-1 ने मात देत सुवर्ण पदकावर नाव कोरलं.

तर कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय महिला थोडक्यात पराभूत झाल्याने ग्रेट ब्रिटेनने कांस्य पदक मिळवलं.

सुवर्ण पदक- नेदरलैंड्स
रौप्य पदक- अर्जेंटीना
कांस्य पदक- ग्रेट ब्रिटेन

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021 : महिला हॉकी संघातील हरयाणाच्या खेळाडूंना बक्षिस, प्रत्येकी 50 लाख रुपये देऊन होणार सन्मान

रवी दहियाचं गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर

Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई

(Hockey Game Medal tally in Tokyo Olympic Indian mens won bronze and belgium won gold)