रवी दहियाचं गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमारच्या मार्गदर्शनाखाली रवी दहियाने कुस्तीचे डावपेच शिकले आहेत.

रवी दहियाचं गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर
सुशील कुमार, रवी दहिया
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 6:36 PM

आज सगळ्या देशाचं लक्ष टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) रवी दहियाच्या (Ravi Dahiya) कुस्तीकडे होतं. या सामन्यात रवीचा थोडक्यात पराभव झाला पण रवीनं रौप्य पदकावर (Silver Medal) आपलं नाव कोरलं. या सामन्यात रशियाच्या जावूर युगुयेवने सुवर्णपदक मारलं. रवी दहियाचं सुवर्णपदक हुकल्याचं दुःख संपूर्ण भारताला झालं. इकडे ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता कुस्तीपटू आणि सध्या तिहार जेलमध्ये असलेल्या सुशीलकुमारला (Sushil Kumar) या सामन्यानंतर अश्रू अनावर झाले होते. रवी दहियाला सुवर्णपदक न मिळाल्यानं सुशीलकुमार भावनिक झाला होता. (wrestler sushilkumat saw ravi dahiya tokyo olympic match in tihar jail and get emotional after loss of gold medal)

तिहार जेलमध्ये पाहिला सामना

पैलवान सुशीलकुमार सागर धनखड हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. तो सध्या तिहार जेलमध्ये आहे. जेलमध्येच सुशीलकुमारने रवी दहियाचा ऑलिम्पिकमधला सामना पाहिला. 57 किलो वजनी गटात फायनलमध्ये रवीचा निसटता पराभव झाला. या पराभवाचं मोठं दुःख सुशील कुमारला झालं. रवी दहियाचं गोल्ड मेडल हुकल्यानं सुशील कुमार भावनिक झाला.

तिहार जेलमध्ये जेल प्रशासनाने मोकळ्या जागेत कैद्यांसाठी टीव्हीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पैलवान सुशीलकुमारला इतर कैद्यांसोबत इथे ऑलिम्पिक खेळांचे सामने पाहण्याची परवानगी आहे. रवी दहियाचा सामनाही सुशीलने सर्व कैद्यांसमोर पाहिला. रवीचा सामना पाहण्यासाठी तो दुपारपासूनच टीव्हीसमोर बसून होता.

दिल्लीत एकत्र गिरवले कुस्तीचे धडे

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमारच्या मार्गदर्शनाखाली रवी दहियाने कुस्तीचे डावपेच शिकले आहेत. रवी दहियाने टोक्यो ऑलिम्पिकच्या 57 किलो वजनी गटात फायनलपर्यंत मजल मारली होती. फायनलमध्ये रशियाच्या पैलवानाने रवीचा पराभव केला पण रवीनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं. अशी कामगिरी करणारा रवी दुसरा भारतीय पैलवान ठरलाय. रवीच्या आधी सुशील कुमारनेच ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलं आहे.

दोन ऑलिम्पिक मेडल जिंकणारा सुशीलकुमार

सुशील कुमारने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये दोनदा मेडल पटकावलं आहे. सुशीलकुमार आता हत्येच्या आरोपात जेलमध्ये असला तरी त्यानं 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. दोन ऑलिम्पिक मेडल पटकावणारा सुशील पहिला भारतीय खेळाडू आहे. (wrestler sushilkumat saw ravi dahiya tokyo olympic match in tihar jail and get emotional after loss of gold medal)

संबंधित बातम्या :

Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई

Tokyo Olympic 2021 : शेवटच्या 10 सेकंदात भारताच्या हातातून निसटलं कांस्य पदक, पैलवान दीपक पूनियाचा 4-2 ने पराभव

भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये दुसरं रौप्य, रवीकुमार दहियानं इतिहास रचला, नरेंद्र मोदींकडून ट्विट करत अभिनंदन

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.