Tokyo Paralympics मध्ये पावरलिफ्टर सकीना खातूनची कमाल, पदक न जिंकताच रचला इतिहास

| Updated on: Aug 27, 2021 | 1:10 PM

तिसऱ्या दिवशी पावरलिफ्टर सकीना सकीनाने पॅरालिम्पिक्समधील पावरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे नेतृत्त्व केले. याआधी तिने कॉमनवेल्थ खेळांत दोनदा पदक जिंकले आहे. पण पॅरालिम्पिक्समध्ये ती पदक जिंकण्यापासून थोडक्यात हुकली.

Tokyo Paralympics मध्ये पावरलिफ्टर सकीना खातूनची कमाल, पदक न जिंकताच रचला इतिहास
सकीना खातून
Follow us on

Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिक 2020 (Tokyo Paralympics-2020) स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारताकडून सकीना खातूनने (Sakina Khatun) पावरलिफ्टिंग स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्त्व केले. तिने 50 किलो ग्राम वजनी गटात पाचवे स्थान पटकावले. त्यामुळे ती पदक मिळवण्यापासून हुकली. पण पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणारी ती पहिली महिला पावरलिफ्टर बनल्याने तिने एक नवा इतिहास रचला. याआधी भारताकडून केवळ पुरुष खेळाडूच या स्पर्धेत सहभागी झाले होते.

सकिनाने दुबईमध्ये झालेल्या पॅरा पावरलिफ्टिंग विश्व चषकात 80 किलो वजन उचलत 45 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले होते. ज्यामुळेच ती टोक्यो पॅरालिम्पिक खेळांसाठी पात्र ठरली होती. सकीनाने कॉमनवेल्थ खेळांमध्ये देखील पदक जिंकलं असून ही कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.

पाचव्या स्थानावर सकीना

पावरलिफ्टिंग स्पर्धेत प्रत्येक खेळाडू तीन प्रयत्न करतो.  ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला पदक दिले जाते. दरम्यान पॅरालिम्पिकमधील पावरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सकीनाने पहिल्या प्रयत्नात 90 किलोग्राम वजन उचलले. त्यानंतरच्या प्रयत्नात तिने 93 किलो वजन उचलले. 93 किलो वजन उचलत सकीनै पाचव्या स्थानावर राहिली. तर चीनच्या एचयू डी हिने 120 किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळवलं. तर इजिप्तच्या आर अहमदने 120 किलो वजनच उचलले पण एक प्रयत्न फेल गेल्याने ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

सकीनाचा प्रवास उल्लेखणीय

सकीना खातूनही 20 जून 1989 रोजी बंगळुरु येथील एका सामन्य शेतकऱ्याच्या घराच जन्माला आली. अगदी लहान वयातच सकीना पोलिओची शिकार झाल्याने तिला अपंगत्त्व आले.  तिच्या भविष्यासाठी घरातले फार चिंतेत असत… पण सकीनाला लहानपणीपासूनच खेळण्याची फार आवड असल्याने तिने त्यातच करीयर केलं.  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकीनाने एक शस्त्रक्रिया करत  2010 मध्ये पावरलिफ्टिंगचा सराव सुरु केला. त्यानंतर 2014 मध्ये कॉमनवेल्थ खेळांत तिने 61 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलं. ज्यानंतर तिने परत मागे कधीच वळून पाहिलं नाही आणि आज भारताची आघाडीची पॅरा पावरलिफ्टर बनली आहे.

इतर बातम्या

Tokyo Paralympics: भाविना पटेलने रचला इतिहास, टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवणारी पहिली भारतीय

Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Tokyo Paralympics: भारताने उघडलं विजयाचं खातं, टेबल-टेनिसपटू भाविना पटेल दुसऱ्या सामन्यात विजयी

(In tokyo paralympics powerlifter sakina khatun finishes 5th in 50kg event)