Tokyo Paralympics: भाविना पटेलने रचला इतिहास, टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवणारी पहिली भारतीय

भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये उत्तम कामगिरी करत आहे. सुरुवातीचा एक सामना पराभूत झाल्यानंतर मात्र भाविना एका मागोमाग एक सामने जिंकत चालली आहे.

Tokyo Paralympics: भाविना पटेलने रचला इतिहास, टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवणारी पहिली भारतीय
भाविना पटेल

Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिक 2020 (Tokyo Paralympics-2020) स्पर्धेत भारताच्या भाविना पटेलने (Bhavina Patel) महिलांच्या टेबल टेनिस (Table Tennis) सामन्यांच्या क्लास फोर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे.  राउंड ऑफ 16 मध्ये तिने ब्राझीलच्या ओलिविएराला मात देत विजय मिळवला. भाविनाने तिसऱ्या सेटमध्ये हा सामना जिंकला. सामन्यात भाविनाने पहिला सेट 12-10 ने, दूसरा सेट 13-11 ने आणि तिसरा सेट 11-6 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला. या विजयासह भाविनाने भारतासाठी एक पदक मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे.

याआधी तिने ब्रिटेनच्या मेगन शॅकक्लेटनला नमवत राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश मिळवला होता. त्या सामन्यात चार सेट्सपैकी तीन सेट्स जिंकत भाविनाने सामना आपल्या नावे केला होता. सामन्यात भाविनाने पहिला सेट 11-7 च्या फरकाने जिंकला. ज्यानंतर दुसऱ्या सामन्यात प्रतिस्पर्धी मेगनने पुनरागमन करत 11-9 ने सेट जिंकत सामन्यात 1-1 ची बरोबरी साधली. ज्यानंतर भाविनाने मेगनला एकही संधी न देता सर्व उर्वरीत सेट्स जिंकले. तिसरा सेट भाविनाने 17-15 च्या फरकाने जिंकला. ज्यानंतर अखेरचा सेट ही अत्यंत चुरशीचा झाला ज्यामध्ये मेगनने जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली. पण भाविनाने अप्रतिम खेळ करत 13-11 च्या फरकाने सेट जिंकत सामनाही खिशात घातला.

भाविना पटेलने रचला इतिहास

भारताच्या भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक्सच्या टेबल टेनिस स्पर्धेत इतिहास रचला आहे. या खेळात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. भाविनाने ब्राझीलच्या खेळाडूला नमवत केलेल्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान या नंतर भाविनाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जगातील नंबर दोनची पॅरा टेबल टेनिसपटू असणाऱ्या सर्बियाच्या बोरिस्लावा पेरि (Borislava Perić) हिच्यासोबत असणार आहे.

इतर बातम्या

Tokyo Paralympics 2020: पॅरालिम्पिक्समध्येही यश मिळवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Tokyo Paralympics: भारताने उघडलं विजयाचं खातं, टेबल-टेनिसपटू भाविना पटेल दुसऱ्या सामन्यात विजयी

 Tokyo Paralympics: पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक्ससाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी साधला संवाद, 24 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

(indias table tennis player bhavina patel won her match and reached in quarter finals of tokyo paralympics)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI