‘ते परदेशात होते, राज्यात काय सुरूये हे समजून…’, राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची खोचक टीका
राज्यातील चित्र समजून घ्यायला वेळ लागेल, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत हा टोला लगावला आहे.
राज ठाकरे हे परदेशात होते, राज्यातील चित्र समजून घ्यायला वेळ लागेल, असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत हा टोला लगावला आहे. इतकंच नाहीतर नरेंद्र मोदी यांना राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. काही पक्ष, काही व्यक्ती, काही संघटना ही सतत राज्याच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी निर्माण झाले आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी करत राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली आहे. नुकतीच राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढण्याची घोषणा केली आहे. इतकंच नाहीतर काही करून पदाधिकाऱ्यांना सत्तेत बसवणार असंही राज ठाकरे म्हणाले. यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी

