… तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, आशिष शेलारांच्या टीकेनंतर जरांगे पाटलांचा इशारा
आशिष शेलारांनी केलेल्या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना इशारा देत मराठ्यांना चॅलेंज करू नका, असं वक्तव्य केले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना राजकीय भूमिका घेऊन बोलला तर सडेतोड उत्तर देऊ अशी टीका आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली होती.
आशिष शेलारांनी आम्हाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी करत या भाजप नेत्याला थेट इशाराच दिला आहे. आशिष शेलारांनी केलेल्या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना इशारा देत मराठ्यांना चॅलेंज करू नका, असं वक्तव्य केले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना राजकीय भूमिका घेऊन बोलला तर सडेतोड उत्तर देऊ अशी टीका आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली होती. आशिष शेलार पुढे असेही म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दल आम्ही सकारात्मक असून समर्थनार्थ अशी योग्य भूमिका घेत आहोत. पण ज्यावेळी तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्याअडून राजकीय भूमिका घेऊ लागाल, त्यावेळी सडेतोड उत्तर देऊ मागे-पुढे पाहणार नाही, असं आशिष शेलार यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना सुनावलं होतं.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी

