डावा की उजवा? नंदीच्या कोणत्या कानात बोलल्याने इच्छा पूर्ण होते? योग्य पद्धत घ्या जाणून…
नंदीच्या कानात एखादी इच्छा कुजबुजल्याने ती थेट भगवान शंकरापर्यंत पोहोचते, असे मानले जाते. परंतु, नंदीच्या कोणत्या कानात म्हणजे डाव्या की उजव्या कानात बोलल्याने व्यक्तीची इच्छा पूर्ण होते? इच्छा मागण्याची कोणती पद्धत आहे हे जाणून घेऊ.

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्व आहे. विविध सणांचा हा महिना आहेच याशिवाय या महिन्यात शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरते असे म्हणतात. हिंदू धर्मात भगवान शंकराचे वाहन नंदी याला देखील खूप महत्वाचे स्थान आहे. शिवमंदिरात प्रवेश करताच सर्वात आधी नंदीची मूर्ती शिवाकडे तोंड करून बसलेली दिसते. नंदी हा शिवाचा आवडता भक्त आहे. शिवाच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो. भगवान शिवाच्या द्वारपालाचे सेवक म्हणून नंदी शिवाची सेवा करतात. नंदीच्या कानात एखादी इच्छा कुजबुजल्याने ती थेट भगवान शंकरापर्यंत पोहोचते, असे मानले जाते. परंतु, नंदीच्या कोणत्या कानात म्हणजे डाव्या की उजव्या कानात बोलल्याने व्यक्तीची इच्छा पूर्ण होते? इच्छा मागण्याची कोणती पद्धत आहे हे जाणून घेऊ.
जर तुम्ही तुमची इच्छा नंदीच्या कानात कुजबुजली तर ती भगवान शंकरापर्यंत पोहोचते असे मानले जाते. नंदी हा भगवान शंकराचा भक्त, त्यांचे वाहन असण्यासोबतच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. भगवान शिवाचे नंदीवर अपार प्रेम आहे, त्याचे ते सर्व काही ऐकतात. त्यामुळे शिवाच्या पूजेत नंदीला विशेष महत्त्व आहे.
भगवान शिवाने त्याला वरदान दिले होते की जो कोणी त्याच्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची ती इच्छा भगवान शिव इच्छा नक्कीच पूर्ण करतील अशी नंदीबद्दल श्रद्धा आहे. पौराणिक ग्रंथांमध्येही याचे वर्णन केले आहे. त्यामुळेच आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदीजींच्या कानात बोलतात. परंतु, नंदीजींच्या कानात बोलण्याचे काही नियम सांगितले आहेत. नंदीच्या कानात शुभेच्छा सांगण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते जाणून घेऊ.
नंदीच्या कानात इच्छा सांगण्याचा योग्य मार्ग आणि नियम कोणते?
सर्व प्रथम भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. यानंतर नंदीला पाणी, फुले आणि दूध अर्पण करावे. अगरबत्ती पेटवून नंदीची आरती करावी.
नंदीजींच्या कोणत्याही कानात इच्छा बोलता येत असली तरी डाव्या कानात इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचे मानले जाते.
नंदीच्या कानात आपली इच्छा बोलण्यापूर्वी “ओम” हा शब्द उच्चारावा. असे केल्याने तुमची इच्छा भगवान शंकरापर्यंत लवकर पोहोचते असे मानले जाते.
नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहात ते इतर कुणालाही ऐकता येणार नाही, हे लक्षात ठेवावे. आपली इच्छा अगदी हळू पण स्पष्टपणे सांगा.
आपली इच्छा सांगताना ओठ तुमच्या दोन्ही हातांनी लपवावेत जेणेकरून इतर कोणीही इच्छा सांगताना पाहू शकणार नाही.
कोणाचेही नुकसान होईल, कुणाबद्दल वाईट चिंतने अशी इच्छा मागू नये. तसेच इच्छा मागतान चुकीचे वागू नये, नंदीच्या कानात कुणाबद्दलही वाईट बोलू नये.
आपली इच्छा सांगून झाल्यावर ‘नंदी महाराज, आमची इच्छा पूर्ण करा’ असे म्हणावे. एकावेळी एकच इच्छा सांगावी. लोभाला बळी पडून एकाचवेळी अनेक इच्छा सांगू नये.