AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shinde VS Raut : इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर... शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर, रहमान डकैत कोण? हे....

Shinde VS Raut : इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर… शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर, रहमान डकैत कोण? हे….

| Updated on: Dec 16, 2025 | 3:59 PM
Share

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. संजय राऊत यांनी मनसेसोबतच्या युतीची घोषणा लवकरच होईल असे संकेत दिले. याचवेळी, एकनाथ शिंदेंच्या टीकेला उत्तर देताना राऊत यांनी रहमान डकैत कोण? असा प्रतिप्रश्न करत, मुंबईच्या तिजोरीवरील दरोड्याबाबत कठोर शब्दांत भाष्य केले.

मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) यांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू असून, येत्या काही दिवसांत याबाबत घोषणा होण्याची शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांची भेट घेऊन लवकरच युतीवर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत राऊतांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. याच दरम्यान, संजय राऊत यांनी रहमान डकैत कोण? या प्रश्नावरून एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला. एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले की, मुंबईच्या तिजोरीला वेटोळे घालून घोटाळे करणारे रहमान डकैत कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. मुंबईला कराचीतील लॅरी शहर बनवणारे आणि अमित शहांच्या घशात मुंबई घालू इच्छिणाऱ्यांना महाराष्ट्र ओळखतो, असे राऊत यांनी म्हटले.

Published on: Dec 16, 2025 03:59 PM