AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty and Raj Kundra: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ, … म्हणून अधिक कसून होणार चौकशी

Shilpa Shetty and Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ झाली आहे. 60 कोटीं प्रकरणी आता सेलिब्रिटी जोडप्याची आणखी कसून चौकशी होणार आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा – राज यांच्या वादग्रस्त प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

Shilpa Shetty and Raj Kundra: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ, ... म्हणून अधिक कसून होणार चौकशी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी
| Updated on: Dec 17, 2025 | 8:31 AM
Share

Shilpa Shetty and Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे… आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात दाखल गुन्ह्यात आयपीसी कलम 420 जोडला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणी अभिनेत्रीची अधिक कसून चौकशी होईल असं देखील कळत आहे… मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत लावला

शिल्पा आणि राज यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गंभीर आरोप लावून त्यांच्यावरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. उद्योजक दीपक कोठारी यांच्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे, ईओडब्ल्यूने आयपीसीचे हे कठोर कलम जोडले आहे आणि या घडामोडीबद्दल संबंधित दंडाधिकाऱ्यांना योग्यरित्या माहिती दिली आहे… असं वक्तव्य दीपक कोठारी यांच्या कायदेशीर प्रतिनिधींनी जारी केलेल्या निवेदनात केलं आहे. एवढंच नाही तर, प्रकरणाचा तपास लागत नाही तोपर्यंत न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि कुटुंबाली परदेशात जाण्यासाठी बंदी घातली आहे.

कलम 420 काय सांगतो?

संविधानात प्रत्येक गुन्हावर कायदा सांगण्यत आला आहे. त्यापैकी एक म्हणजे 420… या कायद्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीची फसवणूक करणं, अप्रामाणिकपणं मालमत्ता मिळवणं किंवा अप्रामाणिकपणं कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करणं याच्याशी संबंधित आहे.

शिल्पा शेट्टी आणि कुंद्रा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा दोघे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याआधी देखील अनेकदा शिल्पा आणि राज यांना कोर्टाची पायरी चढवी लागली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात असलेल्या राज याला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावं लागलं. पण याप्रकरणी त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर अनेकदा संपत्तीमुळे देखील राज आणि शिल्पा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले… सध्या सर्वत्र शिल्पा – राज यांच्या वादग्रस्त प्रकरणांची चर्चा सुरु आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा