मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडीची चाकं थांबली
संपूर्णपणे रेल्वे रूळावरून हा मातीचा ढिगारा बाजूला केल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत होणार असल्याचे चित्र दिसतेय. मात्र या कामाला किती वेळ लागेल याचा अंदाज अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही, तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेला मोठा फटका बसला आहे.
नंदुरबारमधील डांग परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे रूळावर माती वाहून आल्याने मालगाडीची चाकं जागीच थांबली आहे. तर आता रेल्वे रूळावर वाहून आलेल्या मातीचा ढिगारा, गाळ बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. संपूर्णपणे रेल्वे रूळावरून हा मातीचा ढिगारा बाजूला केल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत होणार असल्याचे चित्र दिसतेय. मात्र या कामाला किती वेळ लागेल याचा अंदाज अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही, तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेला मोठा फटका बसला आहे. सुरत – भुसावळ रेल्वे सेवा ठप्प झाली असून कोळदा-चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरुन पाणी वाहत असल्याने रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या स्टेशनवर थांबून आहेत. लांब पल्याच्या गाड्या अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होतायचं. रेल्वे सेवा कधी सुरू होणार याबाबत प्रशासनाकडून कुठलीही सूचना अद्याप देण्यात आलेली नाही.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

