रिओमध्ये हुलकावणी, डिप्रेशनने गाठलं, मात्र टोकियोमध्ये कमाल केली, मीराबाईच्या रौप्य विजयाच्या 10 खास गोष्टी

| Updated on: Jul 24, 2021 | 1:53 PM

भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमधलं पहिलं वहिलं मेडल मिळवलं आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवून दिलं आहे.

रिओमध्ये हुलकावणी, डिप्रेशनने गाठलं, मात्र टोकियोमध्ये कमाल केली, मीराबाईच्या रौप्य विजयाच्या 10 खास गोष्टी
मीराबाई चानू
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : मीराबाई चानू (Mirabai Chanu)… संपूर्ण भारतात सध्या याच नावाची चर्चा असवी आणि का नसेल, भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी रौप्य पदक मिळवून दिलं आहे ते याच मीराबाईने… कालपर्यंत मणिपुर राज्याची एक आघाडीची वेटलिफ्टर असणारी 26 वर्षीय मीराबाईचं कौतुक आता अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत आहे.

मीराबाईने महिलांच्या वेटलिफ्टिंग प्रकारात स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. या यशासह टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला पहिलं रौप्य पदक (First Silver For india) मिळवून दिलेल्या मीराबाईचा संघर्षही तितकाच आहे.

मीराबाईच्या रौप्य पदकाशी जोडलेल्या काही खास गोष्टी

1.टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी मीराबाई चानू पहिली खेळाडू ठरली आहे. तिने भारताला यंदाचं पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं आहे.

2.मीराबाई चानूने ही कमाल महिलांच्या वेटलिफ्टिंगच्या 49 किलोग्राम वर्गात केली आहे. तिने एकूण 202 किलो वजन उचलंल. ज्यामध्ये स्नॅच राउंडमध्ये 87 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचललं.

3.महिला वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू ही इतिहासातील दूसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या आदी 2000 सालच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये  कर्नम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकलं होतं.

4.मीराबाई चानू ही ऑलिम्पिक्समध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी दुसरी महिला आहे. याआधी बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने ही कामगिरी केली आहे.

5.चानू ऑलिम्पिक पदक जिंकणारी मेरीकॉमनंतरची सर्वाधिक वयाची खेळाडू आहे. मेरीने 29 वर्षाची असताना लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं होतं. तर चानूने 26 वर्षाची असताना ही कमाल केली आहे.

6.मीराबाई चानू ही ऑलिम्पिक्सच्या रिंगच्या डिजाइनच्या इयरिंग्स घालते. हे इयरिंग तिला रियो ऑलिम्पिकनंतर तिच्या आईने दिले होते.

7. टोक्यो ओलिम्पिक पूर्वीच मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये क्लीन अँड जर्क प्रकारात 119 किलो वजन उचलून वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे. पण टोक्योमध्ये ती 115 किलोच उचलू शकल्याने तिचे सुवर्णपदक हुकले.

8. टोक्योमध्ये यश संपादन करणारी मीराबाई रियो ऑलिम्पिक्समध्ये पराभवानंतर काही काळ डिप्रेशनमध्ये देखील गेली होती.

9. पण पुढच्याच वर्षी 2017 मध्ये तिने मेहनत करुन अनेक यशाची शिखरं गाठली. ती वर्ल्ड चॅम्पियन देखील झाली होती.

10. मणिपुरने आतापर्यंत भारताना अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू दिले आहेत. या खेळाडूंच्या यादीत आता मीराबाई चानू सर्वात वरच्या स्थानावर पोहचली आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

Tokyo Olympics 2021 : तिरंदाजी मिक्स्ड टीम स्पर्धेतून भारत बाहेर, दीपिका, प्रवीणची जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

Tokyo Olympics 2021 : 24 जुलै भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील महत्त्वाचा दिवस, ‘हे’ आहे कारण

(Indian weightlifter Chanu Saikhom Mirabai won Silver medal For india Know some special storys behind indias First Tokyo Olympic Medal)