Tokyo Paralympics 2020: प्रमोद भगतचा ‘गोल्डन पॉईंट’ पॅराबॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्ण पदक

| Updated on: Sep 04, 2021 | 4:22 PM

Tokyo Paralympics 2020: भारतीय पॅराबॅडमिंटनपटू टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. नुकतंच भारताच्या प्रमोद भगत याने एक पदक भारताच्या खात्यात टाकलं आहे.

Tokyo Paralympics 2020: प्रमोद भगतचा गोल्डन पॉईंट पॅराबॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्ण पदक
प्रमोद भगत
Follow us on

Tokyo Paralympics : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतीय बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. नुकतंच भारताच्या प्रमोद भगतने (Pramod Bhagat) SL3 स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. आधी सेमीफायनलच्या सामन्यात जपानच्या दायसुके फुजिहाराला नमवत प्रमोदने अंतिम सामन्यात धडक घेतली होती. अंतिम सामन्यात पोहचताच त्याने किमान रौप्य पदक निश्चित केलं होतं. अंतिम सामन्यातही धडाकेबाज कामगिरी करत प्रमोदने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथलला पराभूत केलं. या विजयासोबतच प्रमोदने भारताला स्पर्धेतील चौथं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

असा झाला सामना

दोन्ही सेटमध्ये सरळ विजय मिळवत प्रमोदने सामना जिंकला. पहिला सेट 21-14 च्या फरकाने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये डॅनियलने पुनरागमन करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. पण शेवटच्या काही वेळात प्रमोदने उत्कृष्ट खेळ दाखवल सेट 21-17 च्या फरकाने जिंकत सुवर्णपदक खिशात घातलं.

बॅडमिंटनमध्ये आणखी दोन पदकं निश्चित

भारताने बॅडमिंटनमध्ये (Badminton) आणखी दोन पदकं निश्चित केली आहेत. यामध्ये एक पदक हे भारताचे सुहास यथिराज (Suhas Yathiraj) यांनी सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवल्यानंतर केलं आहे. त्यांनी पुरुषांच्या SL4 कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात इंडोनेशियाच्या खेळाडूला सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. यावेळी पहिला सेट  21-9 तर दुसरा सेट 21-15 ने सुहास यांनी जिंकला. सुहास यथिराज हे आता फायनलमध्ये पोहोचल्याने रौप्य पदकतर निश्चित झालं आहे. पण सुवर्णपदकाची आशाही कायम आहे. सुहास यांच्याच प्रमाणे पॅराबॅडमिंटनपटू कृष्णा नागरने पुरुष एकेरीच्या SH6 गटामध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनच्या क्रिस्टन कूंब्सला मात देत भारताच्या खात्यात आणखी एक पदक निश्चित केलं आहे. 22 वर्षीय कृष्णाने या सामन्यात जगातील पाचव्या क्रमांकाच्या क्रिस्टनला मात दिली. त्याने दोन सरळ सेट्मध्ये विजय मिळवत सामना खिशात घातला. पहिला सेट त्याने 21-10 ने तर दुसरा 21-11 ने जिंकत फायनलमध्ये जागा मिळवली.

हे ही वाचा – 

Tokyo Paralympics 2020: भारतीय नेमबाजांकडून पदकांची लयलूट, अवनीपाठोपाठ मनीषने पटकावलं सुवर्ण तर सिंहराज रौप्यपदकाचा मानकरी

(Indias parabadminton player Pramod Bhagat Won Gold Medal at mens singles tokyo paralympics)