Tokyo Paralympics 2020: भारतीय नेमबाजांकडून पदकांची लयलूट, अवनीपाठोपाठ मनीषने पटकावलं सुवर्ण तर सिंहराज रौप्यपदकाचा मानकरी

Tokyo Paralympics : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये भारतीय शुटर्सने चमत्कार केला आहे. मनीष नरवालने सुवर्ण पदक तर सिंहराजने रौप्यपदक पटकावलं आहे.

Tokyo Paralympics 2020: भारतीय नेमबाजांकडून पदकांची लयलूट, अवनीपाठोपाठ मनीषने पटकावलं सुवर्ण तर सिंहराज रौप्यपदकाचा मानकरी
Manish-Singhraj

Tokyo Paralympics : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये भारतीय शुटर्सने चमत्कार केला आहे. मनीष नरवालने सुवर्ण पदक तर सिंहराजने रौप्यपदक पटकावलं आहे. मनीष नरवालने पी 4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तूल एसएस -1 फायनलमध्ये 218.2 गुणांसह प्रथम स्थान मिळवलं. तर सिंहराज (216.7) दुसऱ्या स्थानावर आहे. आज 2 पदकांच्या कमाईनंतर भारताच्या पदकांची संख्या आता 15 झाली आहे.

मनीषने पटकावलं सुवर्ण तर सिंहराज रौप्यपदकाचा मानकरी

क्वालिफिकेशनमध्ये सिंहराज 536 गुणांसह चौथ्या स्थानावर होता, तर मनीष नरवाल (533) सातव्या स्थानावर होता. मनीष नरवालने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. यापूर्वी अवनी लाखेरा (महिला 10 मीटर एअर रायफल SH1) आणि सुमित अँटिल (पुरुष भाला फेक F64) यांनी सुवर्णपदके जिंकली.

39 वर्षीय सिंहराजला या पॅरालिम्पिकमध्ये दुसरे पदक मिळाले. यापूर्वी त्याने 10 मीटर एअर पिस्तूल SH1 मध्ये कांस्यपदक जिंकले होते. अवनी लाखेराकडेही दोन पदके आहेत. सुवर्ण व्यतिरिक्त त्याने कांस्य जिंकले आहे.

सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 15 पदके जिंकली आहेत. भारताकडे आता 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्यपदके आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रिओ पॅरालिम्पिक (2016) मध्ये भारताने 2 सुवर्णांसह 4 पदके जिंकली.

नरेंद्र मोदींकडून खेळाडूंचं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीष आणि सिंहराज यांचं अभिनंदनपर ट्विट केलं आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अभिमानास्पद कामगिरी सुरु आहे. तरुण आणि अतिशय हुशार मनीष नरवाल यांने मोठे यश मिळवलं आहे. पॅराऑलिम्पिकमधील पदकं हा भारतीय खेळांसाठी एक खास क्षण आहे. त्यांचं अभिनंदन. भविष्यासाठी शुभेच्छा.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI