AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारताने वर्ल्डकप जिंकून क्रिकेट संपवलं’, शोएब अख्तर बरळला; तर शाहिद आफ्रिदीकडून स्तुतीसुमनं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर भारताने नाव कोरलं. भारत आणि न्यूझीलंड सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या आजी माजी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. या प्रतिक्रियांमधून पोटदुखी दिसत होती. आता भारताने जेतेपदावर नाव कोरल्यानंतर पुन्हा एकदा बेताल विधानं केली जात आहेत.

'भारताने वर्ल्डकप जिंकून क्रिकेट संपवलं', शोएब अख्तर बरळला; तर शाहिद आफ्रिदीकडून स्तुतीसुमनं
'भारताने वर्ल्डकप जिंकून क्रिकेट संपवलं', शोएब अख्तर बरळला; तर शाहिद आफ्रिदीकडून स्तुतीसुमनंImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 09, 2026 | 4:22 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी धु्व्वा उडवला. या सामन्यात न्यूझीलंडला कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. भारताने हा सामना एकहाती जिंकला. भारताच्या जेतेपदानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण होतं. दुसरीकडे, शेजारी पाकिस्तानात पोटदुखीची प्रकरणं वाढली होती. कारण भारताने जेतेपद मिळवलं हे काही त्यांच्या पचनी पडलं नाही. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शोएब अख्तरने टीम इंडिया गल्लीतील श्रीमंत मुलासारखी आहे. जो गरीब मुलांना सोबत खेळण्यासाठी घेतो आणि त्यांना हरवण्यासाठी खेळतो. इतकंच काय तर भारताने क्रिकेट संपवून टाकलं आहे.

शोएब अख्तरने पाकिस्तानातील एका मिडिया कार्यक्रमात सांगितलं की, ‘गल्लीत एक श्रीमंत मुलगा असतो. तो सर्व गरीब मुलांना बोलवतो आणि सांगतो क्रिकेट खेळायचं आहे. पण विजय फक्त माझाच असेल. असंच काहीसं भारत आमच्यासोबत करत आहे. पूर्ण क्रिकेट संपवून टाकलं.’ शोएब अख्तरला या माध्यमातून टीम इंडिया शक्तिशाली असल्याचं सांगायचं आहे. टीम इंडिया प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी विजय मिळवत आहे. त्यांच्याशी कोणी सामना करू शकत नाही असं दिसत आहे.

दुसरीकडे, टीम इंडियावर कायम टीकेची झोड उठवणाऱ्या शाहिदी आफ्रिदीनेही कौतुक केलं आहे. त्याने टीम इंडियाचं कॉम्बिनेशन आणि बेंच स्ट्रेंथ विजयास कारणीभूत असल्याचं सांगितलं. ‘टी20 वर्ल्डकप संपला आहे. भारत विजेता होण्यास पात्र होता. हा एक उत्तम संघ संयोजन होता आणि बेंचवरील मुलेही तितकीच चांगली होती. बेंच नेहमीच मजबूत असायला हवी. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत विजेत्यांसारखे खेळले.’

शाहिद आफ्रिदीने संजू सॅमसनचं कौतुक केलं. ‘सॅमसनला सलामीची संधी मिळाली आणि त्याने स्वतःला सिद्ध केले. त्याने हुशारीने फटकेबाजी केली आणि आपला डाव उभारला. अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.’ इतकंच काय तर बुमराह भारतीय गोलंदाजीचा कणा असल्याचं सांगितलं.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप