Tokyo Olympics वरुन परतले भारताचे वीर, विमानतळावर जंगी स्वागत, पाहा VIDEO

| Updated on: Aug 09, 2021 | 5:45 PM

भारताने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत 7 पदकं खिशात घातली. यामध्ये 4 कांस्य, 2 रौप्य आणि एका सुवर्णपदकाचा समावेश होतो.

Tokyo Olympics वरुन परतले भारताचे वीर, विमानतळावर जंगी स्वागत, पाहा VIDEO
भारतीय ऑलिम्पिक खेळाडू
Follow us on

नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या 23 तारखेला सुरु झालेली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा अखेर संपली आहे. त्यामुळे सर्व देशांचे खेळाडू टोक्योमधून (Tokyo Olympics 2020) आपआपल्या घरी परतू लागले आहेत. भारताचा हॉकी संघ आणि एथलेटिक्स संघ देखील नुकताच भारतात परतला आहे. एथलेटिक्स संघाती सदस्य 9 ऑगस्ट रोजी टोक्योतून नवी दिल्लीला पोहोचले. तर भारताची पुरुष आणि महिला हॉकी टीम देखील एकत्रच परतली.

दोन्ही संघ एकाच दिवशी आले असले तरी एथलेटिक्स संघ दुसऱ्या आणि हॉकी संघ दुसऱ्या विमानातून प्रवास करत होता. पण अखेऱ एकाच विमानतळावर पोहोचल्यावर  तेथे उपस्थितांनी खेळाडूंचे जंगी स्वागत केलं. यावेळी सर्व खेळाडूंना फुलांची माळ घातल त्यांचा गौरव केला.  उपस्थित नागरिक जोरजोरात घोषणार देत जल्लोष करत होते.

भारताचे सात पदक विजेते

टोक्योमध्ये भारताला मिळालेल्या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळालं. तर बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.

 

इतर बातम्या

Tokyo Olympics 2021 : भारताची ऑलिम्पिकमधील विक्रमी कामगिरी, अमेरिका आणि चीनचा दबदबा, कुणाला किती पदकं?

Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकची सांगता, भारताकडून बजरंग पुनियाने फडकावला तिरंगा!

(Indias Tokyo Olympics champions neeraj chopra indian athletics team Hockey teams boxers arrived at india)