टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: shashank patil
Updated on: Aug 08, 2021 | 7:42 PM
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी पुढे ढकलण्यात आलेली स्पर्धा यंदा पार पडली. 32 व्या ऑलिम्पिक स्पर्धेची आज अखेर सांगता झाली आहे.
Aug 08, 2021 | 7:42 PM
23 जुलैला सुरु झालेली टोक्यो ओलिम्पिक स्पर्धेची (Tokyo Olympic 2020) आज (8 ऑगस्ट) अखेर सांगता झाली. भारतासाठी यंदाची ऑलिम्पिक शानदार ठरली. भारताने मागील 6 ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं रेकॉर्ड तोडत यंदा 7 ओलिम्पिक पदकं जिंकली. आज झालेल्या सांगता समारोहाला (Closing Ceremony) पैलवान बजरंग पूनियाने (Bajrang Punia) भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं.
1 / 6
टोक्यो ओलिम्पिक सांगता समारोहाला संपूर्ण मैदानाला विविध रंगाची रोषणाई करण्यात आली होती. यावेळी समारोहाची सुरुवात भव्यदिव्य आतिषबाजीने करण्यात आली.
2 / 6
सांगता समारोहाला भारतीय पैलवान बजरंग पूनियाने भारताचा तिरंगा हातात घेऊन संघाचे नेतृत्त्व केले. भारतासाठी ऐतिहासिक ठरलेल्या या ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियानेही कांस्य पदक जिंकलं.
3 / 6
टोक्यो ओलिम्पिक भारतासाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. भारताने 4 कांस्य पदकांसह, 2 रौप्य पदकं आणि एक सुवर्णपदक जिंकलं. विशेष म्हणजे हॉकी पुरुष संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिक पदक जिंकल. तर एथलेटिक्समध्ये 100 वर्षांत पहिल्यांदा भारताच्या नीरजने सुवर्णपदक जिंकून दिलं.
4 / 6
टोक्यो ओलिम्पिक सांगता समारोहावेळी भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यांवर अप्रतिम कामगिरीमुळे समाधान होतं. यावेळी सेल्फि घेताना पैलवान रवी, बजरंग, दीपक आणि हॉकी संघाची महिला खेळाडू.
5 / 6
टोक्यो ओलिम्पिकच्या सांगता समारोहावेळी सर्व संघाचे खेळाडू एका गोलात उभे असल्याने जणू सर्व जगच एका गोलात सामावल्याचं दिसत होतं. संपूर्ण स्पर्धा कोरोना नियमांचे कडेकोट पालन करुन पार पाडण्यात आली.