धन्य ते आई-बाप! नीरज चोप्राची आणखी एक सुवर्ण कामगिरी, आई-वडिलांना पहिलीच विमानाची सैर!

| Updated on: Sep 11, 2021 | 2:09 PM

नीरज चोप्राने रविवारी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. आज आयुष्यातील आणखी एक स्वप्न पूर्ण झालं. आई-बाबांना पहिल्यांदा विमानाचा प्रवास घडवला. सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादासाठी नेहमीच आभारी असेन, असं नीरज चोप्रा म्हणाला.

धन्य ते आई-बाप! नीरज चोप्राची आणखी एक सुवर्ण कामगिरी, आई-वडिलांना पहिलीच विमानाची सैर!
Neeraj Chopra flight
Follow us on

मुंबई : टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकमेवर सुवर्ण पदक मिळवून देणारा पठ्ठ्या नीरज चोप्राने आणखी एक सुवर्ण कामगिरीने देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. नीरज चोप्राने पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. त्याने आपल्या आई-वडिलांना विमानाची सफर घडवली. त्यांच्या आयुष्यातील हा पहिलाच विमान प्रवास ठरला. लेकाच्या सुवर्ण कामगिरीने आधीच गलगलून गेलेले आई-वडील, लेकाच्या या आणखी एका कामगिरीने धन्य झाले.

नीरज चोप्राने रविवारी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. आज आयुष्यातील आणखी एक स्वप्न पूर्ण झालं. आई-बाबांना पहिल्यांदा विमानाचा प्रवास घडवला. सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादासाठी नेहमीच आभारी असेन, असं नीरज चोप्रा म्हणाला.

टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. नीरज ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरला, तर अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय आहे.

87.58 मीटर भालाफेक करत नीरज चोप्राने इतिहास रचला

हरियाणाच्या पानिपतजवळील खांद्रा गावातील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या 23 वर्षीय नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या वेळी त्याने 87.58 मी इतका लांब भालाफेक करून आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर भाला फेकला तरीही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीत सुवर्णपदक खिशात घातलं होतं. त्यामुळे नीरजचा 84 मीटर लांबीचा सहावा थ्रो केवळ औपचारिकता ठरली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं.

नीरजला एक वर्षासाठी इंडिगो फ्लाईटमध्ये मोफत प्रवासाची सुविधा

दरम्यान, नीरजच्या सुवर्ण कामगिरीनंतर त्याला एक वर्षासाठी इंडिगो फ्लाईटमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. “आम्ही तुम्हाला एक वर्षासाठी इंडिगो फ्लाईटमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देऊ इच्छितो. मेहनत, आव्हानांचा सामना करण्याची क्षमता आणि उत्कटता काय करू शकते हे तुम्ही दाखवून दिलंत. मला खात्री आहे की, तुम्ही भविष्यातील भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहात. उत्तम कामगिरी नीरज. ” असं इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्त म्हणाले.

संबंधित बातम्या  

सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्राचा देशभरातून गौरव, इंडिगो फ्लाईट कंपनीचं खास गिफ्ट

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही