सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्राचा देशभरातून गौरव, इंडिगो फ्लाईट कंपनीचं खास गिफ्ट

देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने शनिवारी नीरज चोप्राला गिफ्ट देण्याची घोषणा केली. टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला इंडिगोकडून एक वर्षासाठी अमर्यादित मोफत प्रवास प्रदान करण्यात आलाय.

सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्राचा देशभरातून गौरव, इंडिगो फ्लाईट कंपनीचं खास गिफ्ट

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये (Tokyo Olympics 2020) सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राला (Neeraj Chopra) केवळ अभिनंदनाचे मेसेज आले नाहीत, तर अनेक बक्षिसेदेखील मिळालीत. देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने शनिवारी नीरज चोप्राला गिफ्ट देण्याची घोषणा केली. टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला इंडिगोकडून एक वर्षासाठी अमर्यादित मोफत प्रवास प्रदान करण्यात आलाय.

टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. नीरज ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरला, तर अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय आहे. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्त यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “नीरज, तुमच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ऐकून आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. तुम्ही देशाचा अभिमान वाढवला. मला माहीत आहे की, इंडिगोच्या सर्व कर्मचाऱ्यांना आमच्या कोणत्याही फ्लाईटमध्ये तुमचे स्वागत करण्यासाठी सन्मानित केले जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

नीरजला एक वर्षासाठी इंडिगो फ्लाईटमध्ये मोफत प्रवासाची सुविधा

आम्ही तुम्हाला एक वर्षासाठी इंडिगो फ्लाईटमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देऊ इच्छितो. मेहनत, आव्हानांचा सामना करण्याची क्षमता आणि उत्कटता काय करू शकते हे तुम्ही दाखवून दिलंत. मला खात्री आहे की, तुम्ही भविष्यातील भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहात. उत्तम कामगिरी नीरज. ”

नीरज चोप्रा 7 ऑगस्ट 2022 पर्यंत इंडिगोमध्ये मोफत प्रवास करू शकणार

कंपनीने सांगितले की, नीरज पुढील वर्षी 7 ऑगस्टपर्यंत इंडिगो फ्लाईटमध्ये विनामूल्य उड्डाण करू शकतो.

87.58 मीटर भालाफेक करत नीरज चोप्राने इतिहास रचला

हरियाणाच्या पानिपतजवळील खांद्रा गावातील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या 23 वर्षीय नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या वेळी त्याने 87.58 मी इतका लांब भालाफेक करून आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर भाला फेकला तरीही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीत सुवर्णपदक खिशात घातलं होतं. त्यामुळे नीरजचा 84 मीटर लांबीचा सहावा थ्रो केवळ औपचारिकता ठरली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं.

संबंधित बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

After the golden performance, Neeraj Chopra’s glory all over the country, a special gift from Indigo Flight Company

Published On - 6:45 pm, Sun, 8 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI