Tokyo Olympic : कोल्हापूरचे 3, सातारा, बीड, सोलापूरचे प्रत्येकी 1, मराठमोळे 8 खेळाडू ऑलिम्पिकसाठी सज्ज

| Updated on: Jul 23, 2021 | 1:37 PM

टोक्यों ऑलम्पिकमध्ये एकूण 18 प्रकारच्या खेळांमध्ये 126 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्यातील 8 खेळाडू हे महाराष्ट्रातील आहेत.

Tokyo Olympic : कोल्हापूरचे 3, सातारा, बीड, सोलापूरचे प्रत्येकी 1, मराठमोळे 8 खेळाडू ऑलिम्पिकसाठी सज्ज
हेच 8 महाराष्ट्रातील खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत.
Follow us on

मुंबई : टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धांना 23 जुलैपासून जपानच्या टोक्यो शहरात सुरुवात होणार आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धांसाठी भारत आपले आघाडीचे 126 खेळाडू पाठवणार आहे. विविध अशा 18 खेळांमध्ये 126 भारतीय खेळाडू सहभाग घेणार असून 17 जुलैला हे सर्वजण टोक्योसाठी रवाना होणार आहेत. या 126 खेळाडूंमध्ये महाराष्ट्राचे 8 धुरंदरही सामिल आहेत. (This 8 Players From Maharashtra State will Participate in Tokyo Olympic)

भारताने आतापर्यंत पार पडलेल्या ऑलम्पिक स्पर्धांमध्ये सर्वाधिक खेळाडू (126) यंदाच पाठवले आहेत. त्यामुळे यंदा भारतीय खेळाडू जास्तीत जास्त पदके भारताला मिळवून देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या 126 खेळाडूंमध्ये असणारे महाराष्ट्रातील खेळाडू आपआपल्या खेळात अव्वल असल्याने यंदा महाराष्ट्राचे खेळाडू देशासाठी ऑलम्पिक पदक मिळवून देण्याची दाट शक्यता आहे.

सर्वाधिक खेळाडू कोल्हापूरचे

महाराष्ट्रातील 8 खेळाडूंपैकी सर्वाधिक खेळाडू हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूरातील तीन खेळाडू ऑलम्पिकमध्ये सहभाग घेणार आहेत. यामध्ये शुटींग प्रकारात दिग्गज खेळाडू तेजस्वीनी सांवतसह राही सरनोबत सहभाग घेणार आहे. तर पॅरा शूटींग प्रकारात स्वरुप उन्हाळकर सहभागी होणार आहे.

महाराष्ट्रातून सहभागी होणारे खेळाडू

  •  राही जीवन सरनोबत, कोल्हापूर(खेळ-शुटींग-25 मीटर पिस्तूल)
  • तेजस्वीनी सावंत, कोल्हापूर (खेळ-शुटींग-50 मीटर)
  • अविनाश मुकुंद साबळ, बीड (खेळ-अॅथलेटिक्स 3000 मीटर स्टिपलचेस)
  • प्रविण रमेश जाधव, सातारा (खेळ-आर्चरी)
  • चिराग चंद्रशेखर शेट्टी, मुंबई (खेळ-बॅडमिंटन पुरुष दुहेरी)
  • विष्णू सरवानन, मुंबई (खेळ-सेलिंग)
  • स्वरुप महावीर उन्हाळकर, कोल्हापूर (खेळ-पॅरा शुटिंग-10 मीटर रायफल)
  • सुयश नारायण जाधव, सोलापूर, (खेळ-पॅरा स्विमर-50 मीटर बटर फ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मिडले)

18 खेळांध्ये 126 खेळाडू खेळणार

टोक्यों ऑलम्पिकमध्ये एकूण 18 प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय  खेळाडू सहभाग घेणार आहेत. यावेळी स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंची एकूण संख्या 126 आहे. यावेळी भारताला ऑलम्पिकमध्ये सर्वाधिक पदक मिळण्याची शक्यता निशानेबाजी, तिरंदाजी आणि कुस्ती या खेळात आहे. भारतीय हॉकी संघाची कामगिरी पाहता त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.  भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारी टोक्यो ऑलम्पिकपूर्वीच जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आली असल्याने देशाला तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

हे ही वाचा :

प्रवीण तू चॅम्पियन, जपान गाजवून ये, साताऱ्याच्या तिरंदाजाला मोदींचा सल्ला, माता-पित्यांना मराठीत म्हणाले,….

Tokyo Olympics 2020 मध्ये सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील खेळाडूंसाठी खुशखबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

Tokyo Olympics 2020 : 5 व्या वर्षी अनाथ, मजुरी करणाऱ्या आजीने सांभाळलं, सरावासाठी शूजही नव्हते, आता भारताकडून ऑलम्पिक गाजवणार

(This 8 Players From Maharashtra State will Participate in Tokyo Olympic)