सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

| Updated on: Aug 08, 2021 | 12:12 PM

भारताला एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या नीरज चोप्राचं देशभरातून कौैतुक होत आहे. अशा या सुवर्णवीराचं महाराष्ट्राशी अगदी खास असं रक्ताचं नातं आहे.

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं मराठा कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात
नीरज चोप्रा
Follow us on

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) नीरज धावला, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरातील सगळी ताकद हातात एकवटून नीरजने भाला फेकला आणि थेट सुवर्णपदकाला गवासणी घातली. एथलेटिक्समध्ये भारताने मिळवलेले हे सुवर्णपदक म्हणजे सर्वंच भारतीयांसाठी या कोरोनाच्या संकटात एक सुखद गोष्ट ठरली. नीरजने गोल्ड मिळवलं आणि सोशल मीडियापासून ते गल्लीबोळात सर्वत्र नीरजचीच चर्चा होऊ लागली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत असलेला या नीरजचे पूर्वज हे मूळचे महाराष्ट्राचे… रोड मराठा असणाऱ्या नीरजच्या रक्तातच मराठ्यांची ताकद असल्याने त्याने केलेली ही कामगिरी मराठ्यांचं युद्धकौशल्य कसं होतं याची प्रचिती देते.

नीरजचा जन्म 27 डिसेंबर 1997 ला हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या खांद्रा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. चंदीगडमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने हा खेळ शिकला आणि आज खेळातील सर्वोच्च मान मिळवला. पण पानिपत जिल्ह्यातील हा नीरज त्याच मराठ्यांपैकी एक आहे. जे पानीपतच्या युद्धानंतर तेथील आसपासच्या गावांमध्ये स्थायिक झाले होते. तिथे राहताना अधिक अडचणी येऊ नयेत म्हणून तेथील एक राजा रोड याच्या नावाची मदत घेत ते ‘रोड मराठा’ असं स्वत:ला म्हणवून घेऊ लागले.  विशेष म्हणजे 2016 साली भारतात झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावल्यानंतर एका इंग्रंजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण रोड मराठा असून आपल्याला त्याचा अभिमान असल्याचं त्यानं म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीसांनी दिल्या अनोख्या शुभेच्छा 

नीरज चोप्रावर संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशावेळी भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरजला शुभेच्छा देत एक कविताच लिहिली आहे. त्यांनी ट्विट करत शेअर केलेली ही कविता नीरजचं महाराष्ट्राशी आणि पानिपतच्या युद्धाशी असणाऱ्या नात्याचं वर्णन करत आहे-

कोण आहेत रोड मराठा?

मराठ्यांच्याच नाहीतर अवघ्या भारताच्या इतिहासातील एक सर्वात मोठं युद्ध म्हणजे 14 जानेवारी 1761ला झालेलं पानीपतंच युद्ध. पेशवा सदाशिव भाऊंच्या नेतृत्त्वाखाली अफगानिस्तानच्या अहमद शहा अब्दालीविरुद्ध लढलेल्या या युद्धात मराठा पराभूत झाले. जवळपास 40,000 ते 50,000 मराठा सैनिक मारले गेल्याचंही म्हटलं जातं. तर त्याचवेळी काही सैनिकांनी युद्धांत पराभवानंतर आजूबाजूच्या परिसरात आश्रय घेतला आणि ते तिथेच स्थायिक झाले. राहण्यास अडचण येऊ नये म्हणून त्यांनी त्या परिसरातील एक राजा रोडच्या नावानं स्वतःची ओळख करून देण्यास सुरुवात केली. आज हेच रोड स्वतःची ओळख गर्वाने ‘रोड मराठा’ अशी करून देतात. पानिपत, सोनिपत, करनाल, कैथल, रोहतक या जिल्ह्यांमध्ये रोड मराठा समजाची चांगली संख्या आहे.

असं मिळवलं नीरजनं सुवर्णपदक

भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीराजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या वेळी त्याने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला तरी अद्यारपही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीत सुवर्णपदक खिशात घातलं होतं. त्यामुळे नीरजचा 84 मीटर लांबीचा सहावा थ्रो केवळ औपचारिकता ठरली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं.

इतर बातम्या

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

Neeraj Chopra Profile : वय अवघं 23, कोरोनाची बाधा, तरीही बधला नाही, सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोप्राची कहाणी!

(Tokyo Olympic Gold medal winner neeraj chopra is road maratha know neerajs relation with maharashtra)