Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 07, 2021 | 9:50 PM

सुवर्ण पदकावर नाव कोरल्यानंतर आता नीरजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऑलिम्पिक पदक वितरणादरम्यान तिरंगा उंचावण्यात आला. त्यावेळी राष्ट्रगीत सुरु असताना नीरज भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण
नीरज चोप्रा, सुवर्ण पदक विजेता, टोकियो ऑलिम्पिक

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरज चोप्राच्या खेळीकडे संपूर्ण भारताच्या नजरा लागल्या होत्या. त्याचवेळी नीरजनं स्वत:सह 130 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. सुवर्ण पदकावर नाव कोरल्यानंतर आता नीरजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऑलिम्पिक पदक वितरणादरम्यान तिरंगा उंचावण्यात आला. त्यावेळी राष्ट्रगीत सुरु असताना नीरज भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रगीत पूर्ण झाल्यानंतर मैदानात ‘भारत माता की जय’चा एकच नाद घुमला. नीरजचा हाच व्हिडीओ लाखो लोकांकडून आता शेअर करण्यात येत आहे. (Video of Neeraj Chopra getting emotional after winning gold medal in Tokyo Olympics)

दुसऱ्या फेरीतील थ्रोची आघाडी कायम

भालाफेकीत नीरज चोप्राची धडाकेबाज सुरुवात केली. नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. फायनलमध्ये तो अशीच दमदारी कामगिरी करुन, आज तो पदक मिळवतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. नीरज चोप्रानं तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला. तर, नीरज चोप्राचा चौथा थ्रो फाऊल ठरला. नीरजनं टाकलेला पाचवा थ्रो देखील फाऊल ठरला आहे. सहाव्या फेरीत नीरजनं 84 मीटर थ्रो फेकला. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

नीरज चोप्राची पार्श्वभूमी

नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा इतरांप्रमाणं क्रिकेट खेळत होता. नीरज चोप्रानं मार्च 2021 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस पटियाळा येथे 88.07 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता. 2018 मध्ये नीरज चोप्रानं आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यावेळी त्यानं 88.06 मीटर भाला फेकला होता.

संबंधित बातम्या : 

Neeraj Chopra Profile : वय अवघं 23, कोरोनाची बाधा, तरीही बधला नाही, सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोप्राची कहाणी!

नीरज चोप्राने सुवर्णपदकांचा दुष्काळ संपवला, देशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात; अजित पवारांकडून कौतुक

Video of Neeraj Chopra getting emotional after winning gold medal in Tokyo Olympics

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI