AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'भाई को उडा देंगे... 5 करोड दे दो...', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान...

‘भाई को उडा देंगे… 5 करोड दे दो…’, म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान…

| Updated on: Oct 22, 2024 | 2:15 PM
Share

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला गेल्या आठवड्यात १८ ऑक्टोबर रोजी धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. बिश्नोई गँगसोबतचा वाद मिटवण्यासाठी तब्बल ५ कोटी रूपयांची मागणी करण्यात आली होती. यानंतर आता आरोपीने माफी मागितली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगकडून बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी देण्यात आली होती. मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपद्वारे सलमान खानच्या धमकीचा मेसेज मिळाल्याचे समोर आले होते. बिश्नोई गँगसोबतचा वाद मिटवण्यासाठी तब्बल ५ कोटी रूपयांची मागणी सलमान खानकडे करण्यात आली होती. मुंबई ट्राफिक पोलिसांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवलेल्या या मेसेजमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर त्यात ‘लॉरेन्स बिश्नोईसोबतचं वैर संपवण्यासाठी समलान खानने ५ कोटी रूपये द्यावे. हा मेसेज हलक्यात घेऊ नका, अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकींपेक्षा खूप वाईट होईल’, असे म्हटले होते. दरम्यान, सलमान खानला ५ कोटींच्या खंडणीची धमकी देणाऱ्या आरोपीने आता माफी मागितली आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांच्या नंबरवर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीकडून माफीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. यामध्ये चुकीने धमकीचा मेसेज पाठवला असल्याचा उल्लेख कऱण्यात आला आहे. तर माफीचा मेसेज केल्यानतंर आरोपीला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम झारखंडमध्ये दाखल झाली आहे.

Published on: Oct 22, 2024 02:15 PM