ICC Test Rankings : स्मिथला मागे टाकत विराट कोहली आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी

| Updated on: Dec 04, 2019 | 7:24 PM

भारतीय संघाचा कर्णधार रनमशीन विराट कोहलीने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल क्रमांक (Icc Test Rankings Virat Kohli No 1) पटकावला आहे.

ICC Test Rankings : स्मिथला मागे टाकत विराट कोहली आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार रनमशीन विराट कोहलीने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल क्रमांक (Icc Test Rankings Virat Kohli No 1) पटकावला आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे टाकले (Icc Test Rankings Virat Kohli No 1) आहे. विराटने बांग्लादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात चांगली खेळी केल्याने त्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली (Icc Test Rankings Virat Kohli No 1) आहे.

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विराट कोहली 928 क्रमांकासह पहिल्या स्थानावर आहे. तर स्टीव्ह स्मिथ 923 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अॅशेस सीरिजमध्ये स्मिथने चांगली कामगिरी केल्याने तो अव्वल स्थानी होता. मात्र पाकिस्तानविरोधात नुकत्याच झालेल्या मालिकेतील खराब कामगिरीमुळे त्याच्या क्रमवारीत घसरण झाली.

तर दुसरीकडे कोहलीने बांग्लादेशविरुद्ध कसोटी सामन्यात 136 धावांची शतकी खेळी केली. याचा फायदा त्याला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत झाला आणि त्याने अव्वल स्थान पटकावले. विराटने नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात 774 धावा (Icc Test Rankings Virat Kohli No 1) केल्या.

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्या. या मालिकेनंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. यात पहिल्या दहा फलंदाजांमध्ये विराट कोहलीशिवाय चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थानावर आणि अजिंक्य रहाणे सहाव्या क्रमांकावर आहे.

आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने अव्वल स्थान कायम राखलं आहे. या गोलंदाजांच्या यादीत भारताच्या मोहम्मद शमीने टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे. मोहम्मद शमी 771 अंकांसह दहाव्या स्थानावर आहे. तर 772 अंकांसह आर. अश्विन नवव्या आणि 794 अंकांसह जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथला चेंडूशी अवैधरित्या हाताळणी (बॉल टेम्परिंग) केल्याने एक वर्षासाठी क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या अॅशेज कसोटीत चांगले प्रदर्शन करत पहिला क्रमांक पटकावला (Icc Test Rankings Virat Kohli No 1) होता.