पलाश मुच्छलच्या गर्लफ्रेंडची लिस्ट पाहून थक्क व्हाल; त्याने आतापर्यंत किती मुलींना डेट केले आहे?

पलाश मुच्छलच्या प्रेमसंबंधांची सध्या जोरदार चर्चा आहे. स्मृती मानधनासोबतचे लग्न ऐनवेळी रद्द झाल्यावर, सोशल मीडियावर पलाशच्या इतर गर्लफ्रेंड्सची माहिती समोर आली आहे. तो त्याच्या जुन्या नात्यामुळे त्याचे वैयक्तिक आयुष्य वादात सापडले आहे. पलाशने आतापर्यंत किती मुलींना डेट केले हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.

पलाश मुच्छलच्या गर्लफ्रेंडची लिस्ट पाहून थक्क व्हाल; त्याने आतापर्यंत किती मुलींना डेट केले आहे?
You will be surprised to see the list of Palash Muchhal girlfriend,
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2025 | 9:06 PM

भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि अनेक हिट गाणी लिहिणारा प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न 23 नोव्हेंबरला होणार होतं, संध्याकाळी 4.30 चा मुहूर्तही ठरला होता पण त्याआधीच एक अशी घटना घडली की सर्वांनाच धक्का बसला. ऐन लग्नाच्या काही तास आधी स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्टअटॅक आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

स्मृती साखरपुड्याचे फोटो डिलीट केले 

त्यामुळे लग्नही पुढे ढकलण्यात आलं असल्याचं सांगितलं गेलं. तिच्या वडिलांची तब्येत बरी असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. पण याच दरम्यान अजून एक खळबळजनक घटना घडली ते म्हणजे स्मृतीने तिच्या सोशल अकाउंटवरून पलाश आणि तिचे साखरपुड्याचे, प्री-वेडींगचे वैगरे सगळे फोटो डिलीट केले आहेत.त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागल्याचं समोर आलं.

कोरिओग्राफर मेरी डि’कोस्टासोबत नाव जोडले गेले 

या दरम्यान आता कोरिओग्राफर मेरी डि’कोस्टा या मुलीसोबत पलाशशी संबंधित अफवा ऑनलाइन पसरत आहेत. या दोघांचे चॅटचे स्क्रिनशॉटही व्हायरल झाले आहेत. पलाश त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आता चर्चेत आला आहे.

पलाशला एक रोमँटिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले 

त्याच्या याआधीच्या डेटिंग आणि नातेसंबंधांबद्दल सोशल मीडियावर सर्वच घटना समोर येताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत, त्याचे नाव अनेक मुलींशी जोडले गेले आहे. ज्यांना त्याने प्रेमात प्रपोज केले आहे. त्यामुळे पलाशने आतापर्यंत किती मुलींना डेट केलं आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांनी सगळंच सोशल मीडियावर उघड केलं आहे. तसेच अनेकांना हे जाणून घेण्याची इच्छा आहे की त्याने आतापर्यंत किती जणींना डेट केलं आहे. कारण सर्वांसाठीच त्याची ही बाजू धक्कादायक आहे. पलाशला एक रोमँटिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. त्याने आता पर्यंत किती मुलींना डेट केलं, कोणासोबत त्याचे रिलेशन होते जे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत जाणून घेऊयात.

 

Palash Muchhal Girlfriends

पलाशचे नाव आतापर्यंत किती मुलींशी जोडलं गेलं आहे?

बिरवा शाह

ज्यामुळे त्याच्या मागील नात्यांबद्दल अटकळ बांधली जात होती. 2017 मध्ये पलाश आणि बिरवाची ओळख काही मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये झाली होती.त्यानंतर त्यांची ओळख पुढे वाढल्यानंतर पलाश आणि बिरवा हे रिलेशनमध्ये होते. बिरवा शाह ही पलाशची एक्स प्रेयसी होती. एवढंच नाही तर पलाशने रोमँटिक सजावट आणि सुंदर सेटअपसह फिल्मी पद्धतीने बिरवाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी बिरवा जय हिंद कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. मित्रांमुळे दोघांमध्ये जवळचे नाते निर्माण झाले असे मानले जात होते. तिच्यातो लग्न करणार असल्याचंही म्हटले जाते. पण त्यांचे नाते पुढे जाऊन फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. तसेच पलाश घरी देखील त्यांच्या या नात्याबद्दल माहित असल्याचं बोललं जातं.

मेरी डि’कोस्टा

स्मृतीसोबत रिलेशनमध्ये असताना पलाश मेरी डि’कोस्टा नावाच्या मुलीसोबत फ्लर्टींग करत होता असं म्हटलं जातं. ती एक कोरिओग्राफर असून तिच्यासोबतचे चॅटचे स्क्रिनशॉटही सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यामुळे तो एकाचवेळी पलाश मेरी आणि स्मृती दोघांनाही फसवत असल्याचं म्हटलं जात आहे.

स्मृती मानधना

पलाशने लग्नासाठी प्रपोज केलेली तिसरी मुलगी म्हणजे भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना. पलाश आणि स्मृती गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने स्मृतीला त्याच स्टेडियममध्ये फिल्मी स्टाइलने प्रपोजही केले होते. या जोडीने इंस्टाग्रामवर त्यांचे बरेचसे फोटो टाकले होते. स्मृती आणि पलाश 23 तारखेला एकमेकांशी लग्नही करणार होते. परंतु स्मृतीच्या वडिलांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.

स्मृती आणि पलाशचे लग्न होणार 

मात्र आता पलाशबद्दलच्या येत असलेल्या या वेगवेगळ्या अफवांमुळे स्मृती आणि पलाशचे लग्न होईल का? किंवा त्याने फसवणूक केल्याच्या अफवा खऱ्या आहेत का? या सर्वांबद्दलचे सत्य येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईलच. तसेच पलाश मुच्छलने फसवणूक केल्याच्या वृत्ताला स्मृती किंवा तिच्या घरच्यांपैकी कोणीही दुजोरा दिला नसला तरी, त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.