ChatGPT चे हे 5 भन्नाट फिचर्स वापरा, पोरं होणार एकदम हुश्शार; पालकांचं टेन्शनच मिटलं!

मुलांच्या अभ्यासात आता AI ची मोठी मदत होणार आहे. AI मुलांना प्रश्नांचे उत्तर थेट न देता ते उत्तर सोडवण्यासाठी मदत करणार आहे. त्यासाठी CHATGPT ने ५ भन्नाट फिचर लाँच केले आहे.

ChatGPT चे हे 5 भन्नाट फिचर्स वापरा, पोरं होणार एकदम हुश्शार; पालकांचं टेन्शनच मिटलं!
CHATGPT
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 4:45 PM

मुलांच्या हातात आता पु्स्तक, वही आणि पेनसोबतच AIची एन्ट्री झाली आहे. एखादा कठीण प्रश्न असो, होमवर्कमधल्या अडचणी असो कि गणिताची न सुटलेली कोडी असो यासर्वांसाठी CHATGPT ची मदत हमखास घेतली जाते. मग काय २ मिनिटांत प्रश्न सोडवलाच म्हणून समजा. पण जर आता थेट CHATGPT कडून त्याचे हे शॉर्टकट्स, पटकन प्रश्न सोडवण्याची पद्धत शिकता आली तर…

याच गोष्टीवर भर देत OPEN AI ने किशोरवयीन मुलांसाठी अभ्यासात मदत करणारे फिचर्स लाँच केले आहेत. यामध्ये मुलांना विषय समजून घेण्यापासून स्वत: उत्तर शोधण्यापर्यंत मदत केली जाणार आहे. एवढंच नाही तर अभ्यासाचा सराव, QUIZ, MATHS आणि विज्ञानाच्या कठीण CONCEPTS VISUAL च्या पद्धतीने समजून घेण्याची सुविधाही मिळणार आहे.

 

AI टीचर म्हणजेच STUDY MODE

या फिचरमध्ये थेट उत्तर देण्याऐवजी STUDY MODE मुलाला स्वत: उत्तर शोधायला लावणार आहे यासाठी मदत करणार आहे. तसेच प्रश्नाचे छोटे भाग करून समजावणे , हिंट देणे, प्रश्न – उत्तर पद्धत या प्रकारे मुलांना शिकवलं जाणार आहे.

 

HOMEWORK ASSINGEMENT REMINDERS फिचर्स

होमवर्क करताना मुलाने CHATGPT ची मदत घेतली तर CHATGPT थेट उत्तर मुलांना देणार नाही. याशिवाय तो होमवर्क कसा सोडवायचा, महत्त्वाचे मुद्दे कसे मांडायचे, सोपी पद्धत कशी निवडायची या गोष्टीकडे भर दिला जाणार आहे. म्हणजेच AI कडून कॉपी पेस्ट करून होमवर्क संपण्याऐवजी स्वत:चे डोकं वापरायची सवय लावण्यावर भर आहे.

अभ्यासासोबतच QUIZ देखील खेळता येणार

मुलांनी धडा वाचलाय किंवा पाठांतर तर झालंय पण मुलांच्या लक्षात राहिल आहे कि नाही यासाठी CHATGPTने QUIZ पद्धत देखील वापरले आहे. त्यामुळे हसत खेळत मुलांना अभ्यास लक्षात ठेवण्यास मदत करणार आहे.

 

VISUAL LEARNING चे फिचर गणित आणि विज्ञान सोप्पे होणार

गणितातील फॉर्म्यूला किंवा विज्ञानातील एखादी कठीण CONCEPT फक्त पुस्तकात वाचून समजणे अवघड जाते. अशावेळी LEARING VISUALIZATION हे फिचर उपयोगी पडणार आहे. CHATGPT मध्ये ७० हून अधिक कठीण CONCEPTS VISUALच्या पद्धतीने समजणे सोप्पे जाणार आहे.

CHATGPT वर PARENTAL CONTROL

अभ्यासावेळी मुलांनी AI वर किती वेळ घालवावा हे ठरवण्यासाठी CHATGPT वर पॅरेंटल कंट्रोल देखील उपलब्ध असणार आहे. यामध्ये पॅरेंट ठराविक वेळेत CHATGPT STUDY MODE सुरू करू शकतात. वापरण्याची ठराविक वेळ सेट करून देऊ शकतात. तसेच वॉईस मोड, इमेज जनरेशन आणि इतर सेंटिंग्जही मॅनेज करू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us