ट्रॅफिकची कटकट मिटणार, भारतात लवकरच उबरची उडणारी रिक्षा!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नवी दिल्ली : प्रवाशांची ट्रॅफिक जॅमच्या कटकटीतून सुटका होणार आहे. कारण आता लवकरच भारतात हवेत उडणारी रिक्षा सुरु होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनीच याबाबतचा माहिती दिली. भारतात लवकरच नवी क्रांती घडून, ऑटो रिक्षाचे रुपांतर थेट आता एअर रिक्षामध्ये होईल, असं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा म्हणाले.  जर हे शक्य झाले तर जवळचा प्रवास आपण […]

ट्रॅफिकची कटकट मिटणार, भारतात लवकरच उबरची उडणारी रिक्षा!
Follow us on

नवी दिल्ली : प्रवाशांची ट्रॅफिक जॅमच्या कटकटीतून सुटका होणार आहे. कारण आता लवकरच भारतात हवेत उडणारी रिक्षा सुरु होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनीच याबाबतचा माहिती दिली. भारतात लवकरच नवी क्रांती घडून, ऑटो रिक्षाचे रुपांतर थेट आता एअर रिक्षामध्ये होईल, असं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा म्हणाले.  जर हे शक्य झाले तर जवळचा प्रवास आपण ड्रोनद्वारे करु शकता. ही सेवा उबर कंपनीतर्फे सुरु करण्यात येणार आहे. उबर काही वर्षात ड्रोनद्वारे वाहतूक सेवा सुरु करेल, असा विश्वास आहे, असं सिन्हा म्हणाले.

सिन्हा म्हणाले, “उबरने एअर रिक्षा सुरु करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आतापासून उपलब्ध केलं आहे. तसं तंत्रज्ञान ते विकसित करत आहेत.  ही सेवा भारतात सुरु करण्यासाठी सरकारतर्फे काही नियमही तयार केले जाणार आहेत. भारतातील शहरातील ट्रॅफिकची परिस्थिती पाहून एअर ऑटो रिक्षा आपल्याला सुरु करावी लागेल”

या क्रांतीमुळे नक्कीच देशात एक वेगळा बदल घडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच दुबईमध्येही पोलिसांसाठी हवेत उडणारी बाईक लाँच करण्यात आली होती. तसेच आता भारतातही ऑटो रिक्षाचे रुपांतर एअर रिक्षामध्ये होणार आहे. त्यामुळे देशातली मोठ्या शहरातील ट्रॅफिकच्या समस्यांपासून प्रवाशांचा  वेळ वाचेल.

दुसरीकडे ड्रोनच्या मदतीने ई-कॉमर्स कंपनी आपल्या ग्राहकांपर्यंत सामान पोहोचवू शकतात. मात्र यासाठी त्यांना 1.0 रेग्युलेशन ड्रोनचा वापर करावा लागणार आहे. भविष्यात सरकार अमेझॉन किंवा दुसऱ्या कोणत्या कंपनीला ड्रोनद्वारे डिलव्हरीची परवानगी देऊ शकते. मात्र ही परवानगी त्यांच्या अॅप्लिकेशनच्या वापरावर ठरेल. यामुळे ग्राहकांना तसेच अमेझॉनसारख्या कंपनीना ड्रोन सेवा सोपी पडेल. ड्रोनमुळे धावपळ आणि शहरातील ट्रॅफिकमुळे वेळ वाचेल आणि सहज सामान ग्राहकांपर्यंत पोहचवणे सोपे होईल.

हेही वाचाVIDEO: पोलिसांच्या ताफ्यात लवकरच उडणारी बाईक