VIDEO: पोलिसांच्या ताफ्यात लवकरच उडणारी बाईक

दुबई (यूएई) : जगात सध्या टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे की तंत्रज्ञानाने आपण घेरले आहोत. नुकतेच चीनने बातम्या देणाऱ्या रोबोट अँकरची निर्मिती केली आहे. चीनने रोबोट अँकरची निर्मिती केली असताना, तिकडे दुबईत वेगळंच तंत्रज्ञान समोर आलं आहे. चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना अद्ययावत तंत्र उपलब्ध झालं आहे. दुबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच चक्क उडणारी बाईक येणार आहे. चोर कितही सुसाट असला तरी […]

VIDEO: पोलिसांच्या ताफ्यात लवकरच उडणारी बाईक
Follow us
| Updated on: Nov 11, 2018 | 1:39 PM

दुबई (यूएई) : जगात सध्या टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे की तंत्रज्ञानाने आपण घेरले आहोत. नुकतेच चीनने बातम्या देणाऱ्या रोबोट अँकरची निर्मिती केली आहे. चीनने रोबोट अँकरची निर्मिती केली असताना, तिकडे दुबईत वेगळंच तंत्रज्ञान समोर आलं आहे. चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना अद्ययावत तंत्र उपलब्ध झालं आहे.

दुबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच चक्क उडणारी बाईक येणार आहे. चोर कितही सुसाट असला तरी तो या उडणाऱ्या बाईकच्या पुढे जाऊ शकणार नाही. ही बाईक 16 फूट उंचीवरुन हवेत उडू शकते. तिचा वेग ताशी 70 किमी इतका आहे. एकदा उडवली तर सलग 40 किमीपर्यंत ती जाऊ शकते. इतकंच नाही तर यामध्ये 3 बॅटरी आहेत, त्या चार्ज करण्यासाठी 3 तास लागतात. या बाईकचं वजन 104 किलो असून ती 115 किलोपर्यंतचं वजन वाहू शकते.

सध्या दुबई पोलिसांना या उडत्या बाईकचं ट्रेनिंग देण्यात येत आहे.  या बाईकची निर्मिती अमेरिकन कंपनीने केली आहे.  स्कॉर्पियन 3 होवर बाईक असं या बाईकला नाव देण्यात आलं आहे. ड्रोनप्रमाणे दिसणारी बाईक 70 किमी वेगाने सुसाट जाऊ शकते. या बाईकची किंमत 39 लाख रुपये आहे.

दुबईमध्ये 2020 पासून या बाईकचा वापर सुरु होणार आहे. सध्या 4 बाईकद्वारे पोलिसांना ट्रेनिंग देण्यात येत आहे. येत्या काळात या बाईक्सची संख्या वाढवण्यात येणार आहे.

दुबईच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘होवर बाईक’चा वापर पोलीस करणार आहेत. आमचे चार कर्मचारी त्या बाईकचे प्रशिक्षण घेत आहे. 2020 पर्यंत या बाईकचा उपयोग आम्ही करु. ज्या ठिकाणी पोहोचता येत नाही अशा ठिकाणी, ट्रॅफिकमध्ये आणि आपात्कालिन परिस्थितीत या बाईकचा वापर होणार आहे. ही बाईक अत्याधुनिक तंत्रज्ञानातून बनवली आहे”.

बाईकची वैशिष्ट्ये

वेग ताशी 70 किमी

16 फूट उंचीवरुन हवेत उडू शकते

एकदा उडवल्यानंतर सलग 40 किमीपर्यंत जाऊ शकते

बाईकचं वजन 104 किलो

115 किलोपर्यंतचं वजन वाहू शकते

किंमत 39 लाख रुपये

https://www.youtube.com/watch?v=h51Gyw-Uirs

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.