वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी; मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली. मेस्सीच्या आगमनापूर्वीच हजारो चाहते स्टेडियमबाहेर जमले होते. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, चाहत्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मेस्सी सेलिब्रिटींसोबत फुटबॉल खेळणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. अर्जेंटिनाच्या या दिग्गज खेळाडूच्या आगमनामुळे मुंबईत उत्साहाचे वातावरण आहे. मेस्सीला पाहण्यासाठी चाहते दुपारपासूनच स्टेडियमबाहेर जमायला लागले होते.
या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. जवळपास 1500 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात असून, ध्वनिक्षेपावरून वारंवार सूचना देण्यात येत आहेत की, केवळ पास धारकांनीच रांगेत उभे राहावे. मेस्सी 2011 नंतर आता 2025 मध्ये भारतात आला असून, तो वानखेडे स्टेडियमवर काही सेलिब्रिटींसोबत फुटबॉल खेळणार आहे. त्यामुळे त्याची जादुई किक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अनेक तरुण मेस्सीची जर्सी परिधान करून आणि पोस्टर्स घेऊन उपस्थित आहेत, त्याची एक झलक पाहण्यासाठी ते आतुर आहेत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर

