ट्विटरच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मोठा बदल, अशा प्रकारे ट्रोल्सला देणार टक्कर

| Updated on: Dec 01, 2021 | 5:58 PM

एखाद्या खात्याने आपल्या धोरणाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ट्विटरने दिला आहे. मात्र, ही कारवाई काय असू शकते, याबाबत कोणतीही माहिती नाही.

ट्विटरच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मोठा बदल, अशा प्रकारे ट्रोल्सला देणार टक्कर
ट्विटरच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मोठा बदल
Follow us on

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. युजर्सच्या वैयक्तिक ओळखीचे संरक्षण करण्यासाठी ट्विटर आपली प्रायव्हसी पॉलिसी(Twitter Privacy Policy) अपडेट करीत आहे. यापुढे वापरकर्त्यांना आता त्यांच्या परवानगीशिवाय कुणाचे फोटो आणि व्हिडिओ यासारखे वैयक्तिक मीडिया शेअर करण्याची परवानगी देणार नाही.

पराग अग्रवाल(Parag Agrawal) हे ट्विटरचे नवीन सीईओ म्हणून रुजू झाल्यानंतर ट्विटरमध्ये नवा बदल करण्यात आला आहे. वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ट्विटर नवे सीईओ अग्रवाल काही महत्वपूर्ण बद करीत आहेत. वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षा सुधारण्यासाठी आजपासून हे पाऊल लागू करण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले आहे. तथापि, त्यात पब्लिक फिगर दाखविणाऱ्या माध्यमांचा समावेश नाही.

अपडेट प्रायव्हसी पॉलिसी या लोकांना लागू नाही

“जेव्हा मीडिया आणि त्यासोबतचे ट्विट मजकूर सार्वजनिक हितासाठी सामायिक केला जातो किंवा पब्लिक डिस्कोर्समध्ये व्हॅल्यू जोडले जाते तेव्हा हे धोरण पब्लिक फिगर्स किंवा व्यक्ती दर्शविणाऱ्या माध्यमांना लागू होत नाही,” असे अपडेट धोरणात म्हटले आहे. तथापि, जर पब्लिक फिगर प्लॅटफॉर्मने सूचित केले की मीडिया फाईल हॅक करण्याचा इरादा आहे, तर ते ट्विटरच्या ‘अपमानास्पद वर्तन’ विरुद्ध नवीन धोरणांतर्गत पोस्ट काढून टाकू शकते.

“फोटो किंवा व्हिडिओंसारखे वैयक्तिक माध्यम शेअर केल्याने एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे संभाव्य उल्लंघन होऊ शकते आणि भावनिक किंवा शारीरिक हानी होऊ शकते,” असे ट्विटरने आज एक विधान पोस्ट केले. पत्ता, ओळख आणि संपर्क तपशील यासारखी संवेदनशील माहिती उघड करणाऱ्या मीडिया फाइल्सवर ट्विटरने आधीच बंदी घातली होती.

धोरणाविरुद्ध गेल्यास ट्विटरने दिला इशारा

एखाद्या खात्याने आपल्या धोरणाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ट्विटरने दिला आहे. मात्र, ही कारवाई काय असू शकते, याबाबत कोणतीही माहिती नाही. तत्पूर्वी, पराग अग्रवाल यांनी सीईओ म्हणून आपल्या पहिल्या सार्वजनिक निवेदनात ‘reshape the future of public conversation’ या ध्येयाबद्दल सांगितले. (Big change in Twitter’s privacy policy, This will give the trolls a bump)

इतर बातम्या

PHOTO | Redmi Note 11T 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, कॅमेरा आणि इतर वैशिष्ट्ये

नोव्हेंबरमध्ये GST मधून कमाईचा नवा विक्रम, सरकारी खात्यात 131526 कोटी जमा