नोव्हेंबरमध्ये GST मधून कमाईचा नवा विक्रम, सरकारी खात्यात 131526 कोटी जमा

केंद्रीय वित्त मंत्रालयाने नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 1,31,526 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती दिली. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण संकलनात CGST म्हणजेच केंद्राचा वाटा 23,978 कोटी रुपये आहे, तर SGST किंवा राज्यांचा वाटा 31,127 कोटी रुपये आहे. IGST च्या खात्यात 66,815 कोटी रुपये जमा झालेत.

नोव्हेंबरमध्ये GST मधून कमाईचा नवा विक्रम, सरकारी खात्यात 131526 कोटी जमा
जीएसटी

नवी दिल्लीः यंदा नोव्हेंबर महिन्यात सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) मधून बंपर कमाई केलीय. सरकारच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरमध्ये जीएसटीमधून 1,31,526 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेय. जीएसटीची ही रक्कम दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रक्कम आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात विक्रमी पातळीवर सरकारने जीएसटीमधून 1.41 लाख कोटींची कमाई केली होती. एप्रिलनंतर नोव्हेंबरमध्ये 1.31 कोटींहून अधिक उत्पन्न दुसऱ्या विक्रमी पातळीवर मिळालेय.

जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर दुसऱ्यांदा जीएसटी संकलनात विक्रम प्रस्थापित झालाय. देशातील आर्थिक व्यवस्था जसजशी रुळावर येत आहे, त्याचप्रमाणे कारखाने आणि व्यवसायही तेजीत आहे. याचाच परिणाम म्हणून नोव्हेंबरमध्ये दुसऱ्यांदा जीएसटी संकलनात नवा विक्रम पाहायला मिळत आहे.

केंद्र-राज्यांना किती रक्कम मिळाली?

केंद्रीय वित्त मंत्रालयाने नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 1,31,526 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती दिली. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण संकलनात CGST म्हणजेच केंद्राचा वाटा 23,978 कोटी रुपये आहे, तर SGST किंवा राज्यांचा वाटा 31,127 कोटी रुपये आहे. IGST च्या खात्यात 66,815 कोटी रुपये जमा झालेत. यामध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या 32,165 कोटी रुपयांचाही समावेश आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार 9,606 कोटी रुपये अधिभार म्हणून प्राप्त झाले आहेत. यामध्ये आयात मालावरील 653 कोटी रुपयांच्या कराचाही समावेश आहे.

तुम्ही किती कमावले?

CGST म्हणजे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर जो केंद्राच्या खात्यात जातो. SGST म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर जो देशाच्या विविध प्रांतांच्या खात्यात जातो. IGST म्हणजे एकात्मिक वस्तू आणि सेवा असतो. नोव्हेंबर 2020 च्या कमाईपेक्षा या वर्षी नोव्हेंबरमधील GST मधून मिळणारे उत्पन्न 25 टक्के अधिक आहे. नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत हे संकलन 27 टक्के अधिक आहे.

एप्रिल 2021 चा विक्रम मोडला

अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, जीएसटी लागू झाल्यापासून यंदाच्या नोव्हेंबर महिन्यातील जीएसटी संकलन सर्वाधिक आहे. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये जीएसटी संकलन सर्वाधिक होते. ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या विक्रमावरही नजर टाकली तर, त्‍या कालावधीतील कलेक्‍शन नोव्‍हेंबरमध्‍ये 1.30 लाख कोटींहून अधिक आहे. नोव्हेंबरमध्ये सरकारला जीएसटीमधून 1.31 लाख कोटींहून अधिक कर प्राप्त झाला. अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की, विक्रमी संकलनातून अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे दिसून येते.

नवीन नियमांचे फायदे

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये जीएसटीमधून 1,30,127 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. या वर्षी एप्रिलमध्ये जीएसटीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई झाली, ही रक्कम सुमारे 1.41 लाख कोटी आहे. अलीकडे सरकारने अनेक धोरणांमध्ये बदल केले आहेत आणि प्रशासकीय हालचालींचा किंवा नवीन धोरणे जारी केली आहेत, ज्याचा GST संकलनात फायदा होत आहे, असंही सरकारचे म्हणणे आहे. गेल्या वर्षभरात सरकारने जीएसटीशी संबंधित अनेक महत्त्वाची पावले उचललीत. या पावलांमध्ये सिस्टीम क्षमतेत वाढ, रिटर्नची शेवटची तारीख संपल्यानंतर निकषांमध्ये सुधारणा, रिटर्नची स्वयं-संख्या, ई-वे बिल ब्लॉक करणे आणि नॉन-फायलर्ससाठी इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी नवीन नियम समाविष्ट आहेत. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या नवीन पावलांमुळे गेल्या काही महिन्यांत रिटर्न फायलिंगमध्ये सुधारणा दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

LIC पॉलिसी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; PAN अपडेट केल्यास IPO मध्ये विशेष सूट

आगपेटीचे सुधारित दर आजपासून लागू; ‘असा’ आहे आगपेटीच्या दरवाढीचा इतिहास

Published On - 5:44 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI