आगपेटीचे सुधारित दर आजपासून लागू; ‘असा’ आहे आगपेटीच्या दरवाढीचा इतिहास

सामान्य नागरिक महागाईने भरडून निघत आहे. पेट्रोल,डिझेल, गॅस अशा सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. विशेष म्हणजे आता आगपेटीच्या किमतीमध्ये देखील दुपटीने वाढ झाली आहे. आजपासून आगपेटीचे नवे दर लागू  झाले आहेत.

आगपेटीचे सुधारित दर आजपासून लागू; 'असा' आहे आगपेटीच्या दरवाढीचा इतिहास
काडीपेटी

मुंबई : सामान्य नागरिक महागाईने भरडून निघत आहे. पेट्रोल,डिझेल, गॅस अशा सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. विशेष म्हणजे आता आगपेटीच्या किमतीमध्ये देखील दुपटीने वाढ झाली आहे. आजपासून आगपेटीचे नवे दर लागू  झाले आहेत. आगपेटीची किंमत दोन रुपये झाली आहे. 40 वर्षांपूर्वी एका आगपेटीची किंमत ही अवघी 25 पैसे इतकी होती. त्यानंतर 20 वर्षांनी त्यामध्ये वाढ करून तीची किंमत 50 पैसे करण्यात आली. तर 2007 साली दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करून, ती प्रति नग एक रुपयाला विकली जाऊ लागली. आता 2021 साली म्हणजे तब्बल 14 वर्षांनी तिची किंमत ही दोन रुपये करण्यात आली आहे.

दरवाढीला ऑल -इंडिया चेंबर ऑफ इंडस्ट्रीची परवानगी 

आगपेटीच्या दरवाढीला ऑल -इंडिया चेंबर ऑफ इंडस्ट्रीच्या वतीने अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. आगपेटी बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. आजपासून आगपेटीचे सुधारीत दर लागू झाले आहेत. आगपेटीचे सर्वाधिक उत्पादन हे दक्षिण भारतामध्ये होते. यामध्ये तामिळनाडू आघाडीवर असून, देशातील 90 टक्के उत्पादन हे एकट्या तामिळनाडूमध्ये होते. सध्या स्थितीमध्ये हजारो लोकांना आगपेटी निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे. विशेष: या उद्योगात काम करणाऱ्या स्त्रीयांचे प्रमाण अधिक आहे.

… म्हणून वाढले आगपेटीचे दर 

आगपेटीची काडी बनवण्यासाठी तब्बल 14 प्रकारच्या कच्च्या मालाचा उपयोग होतो.  यामध्ये लाल स्फॉस्फरसची महत्त्वाची भूमिका असते. मगील काही दिवसांमध्ये स्फॉस्फरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. स्फॉस्फरचे दर प्रति किलो 425 रुपयांवरून  810 रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ त्यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मेनाच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. मेनाचे दर प्रति किलो 58 रुपयांवरून 80 रुपयांवर पोहोचले आहेत. इतर कच्च्या मालाच्या दरवाढीबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने, आगपेटीची किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती राष्ट्रीय लघु मॅचबॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव व्ही. एस. सेतुरथिनम यांनी दिली आहे. दरम्यान वाढत्या औद्योगिकरणामुळे आग निर्माण करण्यासाठी विविध उपकरणाची निर्मिती झाल्यामुळे आगपेटीवरील अवलंबित्व कमी झाले आहे. परिणामी मागणी घटल्याने हा उद्योग संकटात सापडला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

पेट्रोल,डिझेलमधून गेल्या आर्थिक वर्षात दुप्पट महसूल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांची माहिती

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ; हॉटेलमधील जेवनही महागणार

जे केजरीवालांनी केलं ते ठाकरे सरकार करणार का?; दिल्लीत पेट्रोल स्वत, व्हॅट हटवला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI