Googlebook : MacBook ला टक्कर देत Googlebook ची मार्केटमध्ये एन्ट्री; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि भारतात सेल केव्हा सुरू होणार?
Googleने प्रीमियम लॅपटॉपच्या बाजारात Googlebookसह एन्ट्री केली आहे. Gemini AI, Android फोनसोबत इंटिग्रेशन आणि स्मार्ट फीचर्समुळे हा लॅपटॉप MacBookसह प्रीमियम पर्यायांना टक्कर देणार आहे.

लॅपटॉप घ्यायचा म्हटला की डोक्यात लगेच MacBook, Windows येत. त्याच रांगेत आता Google चं नावही येणार आहे. कारण Google ने लॅपटॉपच्या दुनियेत दमदार एन्ट्री केली आहे. या एन्ट्री सोबतच Googlebook देखील लाँच केलाय. Android फोनसोबत सहज कनेक्टिव्हिटी , Gemini ची मदत आणि रोजच्या कामांसाठी लागणारी स्मार्ट फिचर्स यामध्ये असणार आहेत. विशेष म्हणजे Apple च्या MacBook Neo ला टक्कर देण्यासाठी Googlebook मैदानात उतरला आहे. त्यामुळे लॅपटॉपच्या बाजारात आता Google आणि Apple मध्ये नवी टेक्नोलॉजीची टक्कर पाहायला मिळणार आहे.
Googlebook नेमकं काय आहे
Googlebook ही गुगलने लाँच केलेला पहिला प्रिमियम लॅपटॉप आहे. Android स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांच्यातील कनेक्शन अधिक सहज व्हावं यावर कंपनीने विशेष लक्ष दिले आहे. Googlebook मध्ये Android तंत्रज्ञानाचा आधार आणि ChromeOS ची डेकस्टॉप क्षमता यांचा वापर करण्यात आला आहे. Googlebook ची खासियत म्हणजे Andoid फोनसोबत त्याचं इंटिग्रेशन. फोनवर सुरू केलेलं काम लॅपटॉपवर पुढे सुरू ठेवता येईल. वेगवेगळ्या फाईल्स हाताळण अधिक सोप्प जाणार आहे.
Gemini AI आणि AI सबस्क्रिप्शन
Googlebook मधील Gemini मुळे बरीच कामे सोपी होणार आहेत. स्क्रिनवर दिसणाऱ्या पॅरेग्राबद्दल प्रश्न विचारणे, माहिती अधिक समजून घेणे. टेक्ट तयार करणे आणि रोजच्या कामांमध्ये AI चा वापर वाढल्याने काम अधिक फास्ट आणि सोपी होणार आहेत. तसेच Gemini मध्ये टास्क, ऑटोमेशन असे अनेक फिचर्स असणार आहेत. Googlebook खरेदीसोबतच १२ महिन्याचं Google AI Pro सबस्क्रिप्शन मिळणार आहे. तसेच Gemini Advance टुल्ससोबत 5TB क्लाउड स्टोरेज मिळणार आहे.
Magic Pointer
Googlebook मध्ये Magic pointer नावाचं एक वेगळं AI फिचर देण्यात आला आहे. माऊस कर्सरच्या मदतीने स्क्रिनवरील मजकूर, फोटो किंवा इतर गोष्टिवर कर्सर ठेवल्यावर अधिक माहितीसाठी Gemini ला विचारता येणार आहे. तर Gemini थेट त्याच ठिकाणी मदत करणार आहे.
Rambler फिचरही खास
Googlebook मध्ये Rambler नावाचं व्हाइस फिचर देण्यात आलं आहे. बोलून सांगितलेल्या विस्कटलेल्या नोट्सना हे फिचर व्यवस्थित मजकूरात बदलू शकतं. त्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि अॅक्शन आयट्मस वेगळे करण्यासही ते मदत करणार आहे. त्यामुळे मीटींग नोट्स, आयडीया किंवा पटकन केलेल्या व्हॉईस नोट्स हे फिचर व्यवस्थित लावून देणार आहे. Googlebook मध्ये किएट माय Widget ही सुविधा देखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोडिंगची गरज नसून हवा तसा कस्टम Widget तयार करता येणार आहे.
प्रिमियम हार्डवेअऱ
Googlebook ची सुरूवातीची किंमत 899 डॉलर आहे, म्हणजेच 86,000 रूपये आहे. Acer, ASUS, Dell आणि Lenovo यांसारख्या कंपन्याच्या माध्यमातून हा Googlebook उपलब्ध होणार आहे. काही मॉडेल्समध्ये २.८ OLED डिस्प्ले, हॅट्रिक ग्लास ट्रकपॅड आणि बॅकलिट कीबोर्ड मिळणार आहे. Inel आणि Qualcomm चे प्रोसेसर तसेच ४५ TOPS पेक्षा जास्त NPU देण्यात आले आहेत. बॅटरी लाईफ १४ तास असणार आहे.
भारतात कधीपासून मिळणार?
Googlebook ची प्री बुकींग २१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. गुगलने अधिकृतपणे या लॅपटॉपची घोषणा केली असून अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये हे लॅपटॉप ४ ऑक्टोबरपासून २०२६ पासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. गुगलने अद्याप भारतात हा लॅपटॉप केव्हा लाँच होणार याची अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही.